agriculture news in marathi, paddy purchase center, gadchiroli,maharashtra | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीसाठी ८८ केंद्रांना मान्यता
विनोद इंगोले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
गडचिरोली :  आधारभूत किंमतीनुसार खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात ८८ केंद्रांना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच आदिवासी विकास महामंडळ यांच्या वतीने ही खरेदी करण्यात येणार असून त्याची सुरवात सोमवारपासून (ता.१६) होईल. 
 
गडचिरोली :  आधारभूत किंमतीनुसार खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात ८८ केंद्रांना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच आदिवासी विकास महामंडळ यांच्या वतीने ही खरेदी करण्यात येणार असून त्याची सुरवात सोमवारपासून (ता.१६) होईल. 
 
शासनाने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यावर्षी धानाला १५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. गेली काही वर्षे योग्यवेळी धान खरेदी सुरू होत नव्हती. परिणामी व्यापाऱ्यांना मातीमोल भावात धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती. गेल्या वर्षी आणि त्यानंतर सलग यावर्षी दुसऱ्यांदा धान खरेदीची वेळ आणि कालावधी साधला गेला आहे. परिणामी सणासुदीसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणे शेतकऱ्यांना शक्‍य होईल. यावर्षीदेखील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. 
 
येथे आहेत धान खरेदी केंद्रे :-
 •    कोरची तालुका ः कोरची, मसेली, बेतकाठी, मरकेकसा बेडगाव, कोटरा.
 • कुरखेडा तालुका ः रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, यंगलखेडा, कुरखेडा, आंधळी, कढोली, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, देऊळगाव, गोठणगाव, सोनसरी, अंगारा, उराडी.
 •  आरमोरी तालुका ः देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल. 
 •  देसाईगंज तालुका ः पिंपळगाव, विहीरगाव.
 •  गडचिरोली तालुका ः मौशीखांब.
 • धानोरा तालुका ः रांगी, मुरमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, पेंढरी, मोहली.
 •  चामोर्शी तालुका ः घोट, मक्‍केपल्ली, रेगडी, आमगाव, अड्याळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव.
 •  अहेरी तालुका ः अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगूर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिल्ली, जिमलगट्टा.
 • मुलचेरा तालुका ः लगाम, मुलचेरा.
 • सिरोंचा तालुका ः सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली.
 • भामरागड तालुका ः भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेजाराम.
 • एटापल्ली तालुका ः एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, कसनसूर, जारावंडी, गेंदा, कोठमी, हालेवारा.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...