agriculture news in marathi, paddy storage in crisis, gadchiroli, maharashtra | Agrowon

गडचिरोलीत १ लाख ७० हजार क्विंटल धान गोदामाअभावी उघड्यावर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

गडचिरोली  ः गोदामाच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी १ लाख ७० हजार क्‍विंटल धान खरेदी केंद्र परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून ४ लाख ५८ हजार १७५ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

गडचिरोली  ः गोदामाच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी १ लाख ७० हजार क्‍विंटल धान खरेदी केंद्र परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून ४ लाख ५८ हजार १७५ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७१ कोटी १ लाख ५१३ रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली. ४ लाख ५८ हजार १७५ क्‍विंटल इतके ते धान आहे. त्यातील अर्धेअधिक धान गोदामाअभावी उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी १ लाख ९ हजार ३८५ क्‍विंटल धान गोदामात साठविण्यात आले. ६० हजार क्‍विंटल धान भरडाईसाठी राईस मिलमध्ये पाठविण्यात आले. उघड्यावरील ५४ हजार क्‍विंटल धानाची उचल महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे; परंतु तरीही गोदामाच्या उपलब्धतेअभावी १ लाख ७० हजार क्‍विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५४ केंद्रांवरून आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ५३९ क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत ५२ कोटी ३१ लाख ८६ हजार २७१ रुपये आहे. एकूण १८ हजार ४६३ शेतकऱ्यांनी महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री केली. अहेरी उपविभागात यावर्षी ३५ खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आले. त्याद्वारे १ लाख २० हजार ६३५ क्‍विंटल धानाची खरेदी झाली. खरेदी केलेल्या धानाची किंमत १८ कोटी ६९ लाख ८५ हजार २४२ रुपये आहे.

कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत दहा केंद्रावर ७६ हजार १०९ क्‍विंटल धान खरेदी झाली. ११ कोटी ७९ लाख ६९ हजार ३९९  रुपये किमतीचे हे धान आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने १४ केंद्रांवरून १५ कोटी ३ लाख ६३ हजार ९०३ रुपये किमतीच्या ९७ हजार ८ क्‍विंटल धानाची खरेदी झाली. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने १० केंद्रावर ५८ हजार ३५८ क्‍विंटल
धानाची खरेदी झाली असून ९ कोटी ४ लाख ५५ हजार ६२८ रुपये त्याची किंमत आहे.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...