अकोला जिल्ह्यात 990 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी

अकोला जिल्ह्यात 990 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी
अकोला जिल्ह्यात 990 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी

अकोला : प्रशासनाने पैसेवारी जाहीर केली असून, अकोला जिल्ह्यात असलेल्या एकूण 1011 गावांपैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली आहे. या सर्व गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.

वाशीम जिल्ह्यातसुद्धा सन 2017-18 करिता खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 793 महसुली गावांपैकी 774 गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. केवळ 19 गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा जास्त आढळून आली आहे. मात्र या जिल्ह्याची एकूण सरासरी अंतिम पैसेवारी 47 पैसे एवढी आली आहे.

वाशीम तालुक्‍यातील 131 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे, मालेगाव तालुक्‍यातील 122 गावांची पैसेवारी 46 पैसे, रिसोड तालुक्‍यातील 100 गावांची अंतिम पैसेवारी 47 पैसे, मंगरूळपीर तालुक्‍यातील 137 गावांची अंतिम पैसेवारी 49 पैसे, मानोरा तालुक्‍यातील 136 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे व कारंजा तालुक्‍यातील 167 गावांची अंतिम पैसेवारी 47 पैसे जाहीर करण्यात आली आहे.

या हंगामात पावसाने दिलेल्या फटक्‍याचा खरीप हंगामावर परिणाम झाला असून थेट उत्पादकता घटली आहे. याचा परिणाम पैसेवारीवर पडला आहे. जाहीर झालेली अंतिम पैसेवारी सर्व ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून चावडीवर दवंडी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पिकांची उत्पादकता घटली सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद या पिकांचे उत्पादन हेक्‍टरी उत्पादनापेक्षा कमी झाले. सोयाबीन एकरी 50 किलो ते 3 क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. कपाशीचा तर लागवड खर्चही निघालेला नाही. अशीच अवस्था मूग, उडीद या पिकांची होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com