agriculture news in marathi, paisevari status in region, nagpur, maharashtra | Agrowon

शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर विभागातील पीक उत्तम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत असले तरी शासन दरबारी मात्र रब्बीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. रब्बी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे.

नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत असले तरी शासन दरबारी मात्र रब्बीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. रब्बी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे.

मागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र, अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणांत कमी पाणी असल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरसे पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रब्बीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची तक्रार होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे. 

नागपूर विभागात १६६ गावांमध्ये रब्बीत पिके घेण्यात येतात. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रब्बीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीकच घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गावे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. चार गावे भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

पैसेवारी स्थिती
जिल्हा गावांची संख्या पैसेवारी जाहीर केलेली गावांची संख्या
नागपूर ०० ००
वर्धा  ०० ००
भंडारा  १४  १०
गोंदिया ०० ००
चंद्रपूर 
गडचिरोली १४९   ८५

 

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...