agriculture news in Marathi, paisewari at 64 paise after reduce productivity in buldana district, Maharashtra | Agrowon

बुलढाणा जिल्ह्यात उत्पादकता घटल्यानंतरही पैसेवारी ६४ पैसे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

बुलडाणा ः या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची उत्पादकता जेमतेम अाहे. असे असताना कृषी यंत्रणांनी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ६४ पैसे काढली असून, कृषी अायुक्तालयाकडे सादर केली अाहे. त्यातच या हंगामापासून दुष्काळ जाहीर करण्यासाठी नवे निकष गृहीत धरले जाणार असल्याने जिल्ह्याला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत अाहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

बुलडाणा ः या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची उत्पादकता जेमतेम अाहे. असे असताना कृषी यंत्रणांनी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ६४ पैसे काढली असून, कृषी अायुक्तालयाकडे सादर केली अाहे. त्यातच या हंगामापासून दुष्काळ जाहीर करण्यासाठी नवे निकष गृहीत धरले जाणार असल्याने जिल्ह्याला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत अाहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

खरिपात प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची उत्पादता कमालीची घटली अाहे. अनेक शेतकऱ्यांना लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण झाले. अशा परिस्थितीत यंत्रणांनी जिल्ह्याची सरासरी ६४ पैसे काढली. जिल्ह्यातील तेराही तालुके ५० पैशांपेक्षा वर अाहेत.

वास्तविक याही हंगामात जिल्ह्यात पावसाने अनेकदा दडी मारली. पावसाने सरासरी गाठली तरी हा पाऊस खंड स्वरूपातील असल्याने त्याचा थेट पिकांवर परिणाम झाला. मूग, उडीद एकरी क्विंटलपासून उत्पादन झाले, तर सोयाबीनची उत्पादकता एकरी दोन ते तीन क्विंटलपासून सुरू होत अाहे. कापसाचेही पीक चांगले नाही. अशा परिस्थितीत यंत्रणांनी कुठल्या अाधारे ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवली, हा प्रश्न उपस्थित होत अाहे.

शासन स्तरावर आता दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण आणि परिभाषा बदलण्यात अाली आहे. यापूर्वी खरीप हंगामाची नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम पैसेवारी तसेच पावसाच्या वार्षिक सरासरीच्या आधारावर दुष्काळाबाबत निर्णय घेतला जात होता; परंतु अाता केंद्र शासनाने नवी पद्धत निर्धारित करत पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद्रा आर्द्रता आणि जलविषयक असे चार निकष ठरविले अाहेत. 

इतर बातम्या
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
बुलडाण्यात पिकांची उत्पादकता...अकोला : खरीप हंगामात पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
साताऱ्यात ७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीसातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत...
रब्बी पेरणीत बीडची आघाडीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड...
सांगली बाजार समितीत नोकर भरतीला हिरवा...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा...
केळी कटतीचा प्रश्‍न सोडविण्यास...जळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार...
नाशिकला कर्जमाफी याद्या पडताळणीचे ९९...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
मिरची उत्पादनात घटीची शक्यता मुंबई ः गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाला...
परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थितीरायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत...
जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर...
शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू ः...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : शिवसेनेवर दुतोंडी...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
ऊसदरप्रश्नी वांबोरीला काटा बंद अांदोलनराहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा...अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी...मुंबई: राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन...