agriculture news in marathi, paisewari status in buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे दुष्काळाच्या छायेत
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018
बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमधील महसुली ७४८ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची अंतिम पीक पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलती या गावांतील नागरिकांना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४०० गावांपैकी ७४८ गावे दुष्काळाच्या छायेत सापडली आहेत.
 
बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमधील महसुली ७४८ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची अंतिम पीक पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलती या गावांतील नागरिकांना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४०० गावांपैकी ७४८ गावे दुष्काळाच्या छायेत सापडली आहेत.
 
जिल्ह्यातील ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या ७४८ गावांमध्ये जमीन महसुलामध्ये सूट देण्यात आली आहे. या गावांमध्ये कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. आवश्‍यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरचा वापर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 
तसेच रोजगार हमी योजनेतंर्गत कामांचे निकष काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांत सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने करावयाचा आहे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 
 
मलकापूर तालुक्‍यातील ७३ गावांमध्ये खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी आलेली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्‍यातील १२०, नांदुरा तालुक्‍यातील ११२, खामगाव तालुक्‍यातील १४५, शेगावमधील ७४, संग्रामपूर तालुक्‍यातील १०५ आणि जळगाव जामोद तालुक्‍यातील ११९ गावांमध्ये ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...