पाकिस्तान युद्धाच्या तयारीत, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश

पाकिस्तान युद्धाच्या तयारीत, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश

श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. युद्धाच्या स्वरुपातही भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने युद्धाची पूर्वतयारी सुरु केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेट्टा कॅन्टोनमेंट येथील पाकिस्तानी लष्कराच्या हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिस्टिक्स एरियाकडून २० जानेवारी रोजी जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्यानुसार वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्याचे रुग्णालयाला सांगण्यात आले आहे.

‘पूर्व फ्रंटवर आणीबाणी, युद्ध परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सिव्हिल किंवा लष्कर रुग्णालयातून जखमी जवानांना आणले जाऊ शकते. प्राथमिक उपचारानंतर या जवानांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात शिफ्ट करण्याची योजना आहे’, असे हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिस्टिक्सचे फोर्स कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.

यामध्येही असेही सांगण्यात आले आहे की, ‘लॉजिस्टिक्स परिसरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी योजना आखण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सिव्हिल रुग्णालयांमध्ये जवानांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

इतकंच नाही तर खासगी रुग्णालयांनाही २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यासोबत उपचाराच्या सर्व सुविधांसहित सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवारी पाकिस्तानव्याप्त काश्मीर सरकारने नीलम, जेहलूम, रावलकोट, हवेली, कोटली आणि भिंबर येथील स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवत भारतीय लष्कर गोळीबार करु शकतो त्यामुळे त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तेथून हटवले आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचा आवाहन केले आहे. योसाबत कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास लाइट लावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबत गुरांनाही नियंत्रण रेषेवर नेऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com