agriculture news in Marathi, palm oil export Indonesia to India | Agrowon

इंडोनेशियातून भारतात पामतेल निर्यातीत घटीची शक्यता
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई ः पामतेलाच्या निर्यातीत इंडोनेशिया जगात अाघाडीवर अाहे. तर भारत हा पामतेलाचा प्रमुख खरेदीदार देश अाहे. यंदा (२०१७) इंडोनेशियातून भारतात ५.७ दशलक्ष टन पामतेल निर्यात होईल, असा अंदाज इंडोनेशिया पामतेल संघटनेचे प्रमुख जोको सुप्रियोनो यांनी व्यक्त केला अाहे.

हल्लीच भारत सरकारने पामतेल अायातीवरील शुल्क वाढविले अाहे. याचा काही प्रमाणात परिणाम इंडोनेशियातून भारतात होणाऱ्या पामतेल निर्यातीवर होणार अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे.

मुंबई ः पामतेलाच्या निर्यातीत इंडोनेशिया जगात अाघाडीवर अाहे. तर भारत हा पामतेलाचा प्रमुख खरेदीदार देश अाहे. यंदा (२०१७) इंडोनेशियातून भारतात ५.७ दशलक्ष टन पामतेल निर्यात होईल, असा अंदाज इंडोनेशिया पामतेल संघटनेचे प्रमुख जोको सुप्रियोनो यांनी व्यक्त केला अाहे.

हल्लीच भारत सरकारने पामतेल अायातीवरील शुल्क वाढविले अाहे. याचा काही प्रमाणात परिणाम इंडोनेशियातून भारतात होणाऱ्या पामतेल निर्यातीवर होणार अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे.

‘‘भारताने पामतेलावरील अायात शुल्क वाढविण्याअगोदर इंडोनेशियातून पामतेलाची निर्यात चांगली होती. अाम्हाला अधिक निर्यात अपेक्षित अाहे. मात्र, भारताने केलेल्या अायात शुल्कवाढीचा काही प्रमाणात परिणाम निर्यातीवर होईल,’’ असे सुप्रियोनो यांनी म्हटले अाहे.

गेल्या जानेवारी-जूनदरम्यान इंडोनेशियाने भारतात ३.४ दशलक्ष टन पामतेल निर्यात केली अाहे. मात्र त्यानंतर अाॅगस्टमध्ये भारताने पामतेल अायात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढविले. यामुळे पुढील काही दिवसांत निर्यात कमी होणार असल्याचे संकेत मिळत अाहेत.

इंडोनेशियातील पामतेल उत्पादनात वाढ
इंडोनेशियातील पामतेल उत्पादन यंदा ३५.५ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाज अाहे. याअाधीच्या वर्षी (२०१६) पामतेल उत्पादन ३२.५ दशलक्ष टन झाले होते. इंडोनेशियातून भारतात मोठ्या प्रमाणात पामतेल निर्यात केली जाते.

...त्यांना भारतातील ग्राहकांची चिंता
भारतातील शेतकरीहिताच्या दृष्टिकोनातून पामतेलावरील अायात शुल्क केंद्र सरकारने वाढविले. या निर्णयामुळे इंडोनेशियातील तेल उत्पादक संघटनांनी अागपाखड केली. पामतेलावरील अायात शुल्क वाढविल्याचा फटका भारतातील ग्राहकांना बसणार असून, चलनवाढीचा दरही वाढणार अाहे, अशी प्रतिक्रिया इंडोनेशिया पामतेल संघटनेचे सरचिटणीस फदील हसन यांनी व्यक्त केली अाहे. भारत हा इंडोनेशियातून होणाऱ्या पामतेल निर्यातीवर अवलंबून अाहे. मात्र, भारताच्या अायात शुल्कवाढीच्या निर्णयाचा इंडोनेशियातील पामतेल निर्यातीवर परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी भारताने अायात शुल्कवाढीचा निर्णय सक्तीने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे.

भारतात परदेशांतून केलेली पामतेल अायात (दशलक्ष टनांमध्ये)

  • वर्ष...पामतेल
  • २०१२-१३...८.४
  • २०१३-१४...७.६
  • २०१४-१५...८.१
  • २०१५-१६...९.६
  • २०१६-१७ (एप्रिल- डिसेंबर)...६.१

- स्रोत - केंद्रीय वाणिज्य विभाग

 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...