agriculture news in marathi, Panan directorate or commisonarate | Agrowon

पणन संचालनालय की आयुक्तालय?
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे : पणन संचालनालय सक्षम करण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची (आयएएस) नियुक्ती करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शासना पातळीवर सुरू झाला आहे. नुकतेच सनदी अधिकारी संपदा मेहता यांची पणन आयुक्तपदी बदली करण्यात आली हाेती. मात्र, बदली रद्द झाल्याने, नव्याने धीरजकुमार यांची नियुक्तीची चर्चा सध्या पणन संचालनालयामध्ये सुरू झाली आहे, तर पणन संचालनालयाला पणन आयुक्तालय करण्याचीदेखील प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

पुणे : पणन संचालनालय सक्षम करण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची (आयएएस) नियुक्ती करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शासना पातळीवर सुरू झाला आहे. नुकतेच सनदी अधिकारी संपदा मेहता यांची पणन आयुक्तपदी बदली करण्यात आली हाेती. मात्र, बदली रद्द झाल्याने, नव्याने धीरजकुमार यांची नियुक्तीची चर्चा सध्या पणन संचालनालयामध्ये सुरू झाली आहे, तर पणन संचालनालयाला पणन आयुक्तालय करण्याचीदेखील प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

पणन विभागाच्या संचालकपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्या निलंबनानंतर पणन संचालकांचा पदभार तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे देण्याचे आदेश शासनाने दिले हाेते आणि हा पदभार पुढे कायम करण्याचा शासनाचा प्रयत्न होता.

गेल्या वर्षी (एप्रिल २०१७) आयएएस अधिकारी रणजित कुमार यांची पणन संचालकपदी शासनाने नियुक्ती केली हाेती. मात्र, सहकार विभागातील अधिकारी संघटनेने या नियुक्तीला विराेध केला. पणन संचालक हे सहकार विभागातील सर्वाेच्च पद असून, तेथे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनाच नियुक्त करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली हाेती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी नमते घेत रणजित कुमार यांची नियुक्ती रद्द केली हाेती. 

दरम्यान, पणन आयुक्तपदी सनदी अधिकारी संपदा मेहत यांची नियुक्ती शासनाने केली हाेती. ही नियुक्तीदेखील रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली. आता पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया मंत्रालयपातळीवर सुरू झाल्याचे समजते. यासाठी धीरजकुमार यांचे नाव चर्चेत आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...