agriculture news in marathi, Panan federation to purchase Ten lakh Ton sugar | Agrowon

पणन महासंघामार्फत १० लाख टन साखर खरेदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यात पडलेल्या साखरेच्या दरामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांकडील साखरेला ३,२०० रुपये प्रतिक्विंटल दर देऊन पणन महासंघाच्या माध्यमातून साखर खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सुमारे दहा लाख मेट्रिक टन साखर खरेदी करून साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना दिलासा देण्यात येणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

मुंबई : राज्यात पडलेल्या साखरेच्या दरामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांकडील साखरेला ३,२०० रुपये प्रतिक्विंटल दर देऊन पणन महासंघाच्या माध्यमातून साखर खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सुमारे दहा लाख मेट्रिक टन साखर खरेदी करून साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना दिलासा देण्यात येणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

केंद्र सरकारने उसाला ९.५ टक्के रिकव्हरीसाठी २,५५० रुपये प्रतिटन, अधिक प्रति एक टक्का वाढीव उताऱ्यासाठी २६८ रुपये इतकी एफआरपी जाहीर केली. साखरेला प्रतिक्विंटल ३,५०० रुपये भाव मिळेल असे गृहीत धरून हे भाव जाहीर करण्यात आले. 
हंगाम सुरू होण्याआधी साखरेला सुमारे ४,१०० रुपये इतका दर मिळत होता. त्यानुसार कारखानदारांनी पश्चिम महाराष्ट्रात सुमारे तीन हजार रुपयांच्या आसपास दर देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या आयात- निर्यात धोरणामुळे प्रत्यक्षात साखरेचे दर २,८०० रुपयांच्याही खाली आले आहेत. साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण सांगून साखर कारखानदार उसाला मान्य केलेला दर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांनी तर एफआरपीसुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली आहे.

डिसेंबरपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले मिळालेली नाहीत. राज्यात आजच्याघडीला ऊसबिलाची थकबाकी सुमारे दोन हजार कोटींवर गेली आहे. कारखानदारांकडून जाहीर केलेल्या दरात टनामागे पाचशे रुपये कमी दर देण्याचे संकेत दिले आहेत. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
पडलेल्या दरामुळे ऊस उत्पादकांसोबतच साखर कारखानदारही अडचणीत आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांसह कारखानदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत राज्यात ४२ लाख ५० हजार मेट्रिन टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे दहा लाख मेट्रिक टन साखर खरेदी करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.या साखरेला राज्य सरकारकडून ३,२०० रुपये दर देण्यात येणार आहे.

पणन महासंघ कारखानदारांकडून ही साखर खरेदी करणार आहे. पणन महासंघाच्या खरेदीला राज्य सरकार हमी देणार आहे. खरेदी केलेली साखर कारखान्यांच्या गोदामात ठेवली जाणार आहे. त्यानंतर ती आवश्यकतेनुसार पुरवठा केली जाणार आहे. सध्या दराअभावी कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. साखरेचे दर पडल्याने होणाऱ्या नुकसानामुळे ऊस उत्पादकांची नाराजी ओढवेल, या भीतीपोटी राज्य सरकार साखर खरेदी करण्याच्या विचारापर्यंत आल्याचे समजते.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...