पंचगंगा शुद्धीकरणासाठी पुढील आठवड्यात बैठक : खोत

पंचगंगा शुद्धीकरणासाठी पुढील आठवड्यात बैठक - खोत
पंचगंगा शुद्धीकरणासाठी पुढील आठवड्यात बैठक - खोत

कुरुंदवाड, जि. कोल्हापूर : गंगानदी शुद्धीकरणाचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. त्याच धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पंचगंगा शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊ त्यासाठी मंत्रालयात पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे कृषी, फलोत्पादन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नवीन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व नूतन ग्रामपंचायत सभागृहाचे उद्‌घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध राजमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

खोत म्हणाले, ‘‘पाणी जीवनातील अविभाज्य घटक आहे. सध्या `नदी उशाला, कोरड घशाला` अशी अवस्था नद्या प्रदूषणामुळे झाली आहे. शिरोळ तालुक्‍यातील जनतेसाठी पिण्यास शुद्ध पाणी मिळावे यासाठी ७ कोटी ५५ लाख रुपयांचे ५२ वॉटर एटीएम मंजूर केले आहे. त्याचबरोबर कवठेगुलंद गावासाठी ७५ लाखांची पिण्यासाठी पाणीयोजना मंजूर केली आहे.''

भाजप नेते अनिल यादव यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मंत्री खोत, आमदार पाटील यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सभागृहाचे, नवीन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.

जिल्हा परिषद सदस्या परवीन पटेल, राजवर्धन नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, सरपंच सद्दामहुसेन वाळवेकर, उपसरपंच सातगोंडा पाटील, मधुकर जगताप, आनंद कुम्मे, कुमार जगताप, रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबळे, अविनाश कदम, अरुणा सुतार, शोभा सुतार आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी एस. एम. वाघमोडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com