agriculture news in marathi, Pandurang Fundkar always recommended to read AGROWON | Agrowon

‘ॲग्रोवन’ वाचण्याबाबत भाऊसाहेब सतत आग्रही
गोपाल हागे
शुक्रवार, 1 जून 2018

अकोला : भाऊसाहेब फुंडकर दैनिक अॅग्रोवनचे हे एक नियमित वाचक होते. शेती अाणि शेतकऱ्यांच्या विषयावर अायुष्यभर राजकारण केलेल्या या द्रष्ट्या राजकारण्याला दररोज ‘ॲग्रोवन’ वाचल्याशिवाय चैन पडत नसे. ८ जुलै २०१६ रोजी फुंडकर यांनी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली अाणि तेव्हापासून ते कृषिविषयक कुठलाही कार्यक्रम असला, अन् त्यात ‘अॅग्रोवन’चा उल्लेख अाला नाही असे कधीच झाले नाही. 

अकोला : भाऊसाहेब फुंडकर दैनिक अॅग्रोवनचे हे एक नियमित वाचक होते. शेती अाणि शेतकऱ्यांच्या विषयावर अायुष्यभर राजकारण केलेल्या या द्रष्ट्या राजकारण्याला दररोज ‘ॲग्रोवन’ वाचल्याशिवाय चैन पडत नसे. ८ जुलै २०१६ रोजी फुंडकर यांनी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली अाणि तेव्हापासून ते कृषिविषयक कुठलाही कार्यक्रम असला, अन् त्यात ‘अॅग्रोवन’चा उल्लेख अाला नाही असे कधीच झाले नाही. 

शेतकऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते अॅग्रोवनमध्ये आज काय आले, कोणते नवे प्रयोग सुचविण्यात अाले, यशोगाथा याबाबत सांगत. ‘अॅग्रोवन’मध्ये शेती किंवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न आला तरी त्यावर प्रशासनाला तातडीने काम करण्याचे निर्देश देत असत. सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करतानाही अनेकदा ते अॅग्रोवनचा आवर्जून उल्लेख करीत. शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर ‘अॅग्रोवन’ वाचत चला, इतका ते अाग्रह करीत होते. 

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असोत, की सर्वसामान्य शेतकरी या सर्वांना त्यांनी वेळोवेळी ‘अॅग्रोवन’चा हवाला ते उदाहरणे सांगितली. विदर्भातील शेतकऱ्याचा सुखी करायचे असेल, तर ‘अॅग्रोवन’मधील प्रयोगांची माहिती, यशकथा आपल्याला प्रत्यक्ष उतरवाव्या लागतील, असे त्यांचे सांगणे असायचे. अॅग्रोवनमध्ये खात्यासंदर्भात वृत्त झळकले की त्याची तातडीने दखल घेत उचित कार्यवाही करा, असा दमही त्यांनी अनेकदा भरला. 

गेल्या वर्षी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी असा नारा देत सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली. याचा शेगावमध्ये राज्यस्तरीय सोहळा झाला. यात त्यांनी अावर्जून ‘ॲग्रोवन’चा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी वाचन करीत शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोचवावे असेही सांगितले होते. कुठल्याही बैठकीत ते शेती अाणि शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...