agriculture news in marathi, Pandurang Fundkar, A Leader having hold on Politics | Agrowon

पांडुरंग फुंडकर : राजकारणावर पकड कायम ठेवणारा नेता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

भाजपच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले पांडुरंग फुंडकर हे विदर्भात ‘भाऊसाहेब’ या नावानेच अोळखले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला नेता अायुष्यभर स्वयंसेवक म्हणून वावरत होता.

भाजपच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले पांडुरंग फुंडकर हे विदर्भात ‘भाऊसाहेब’ या नावानेच अोळखले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला नेता अायुष्यभर स्वयंसेवक म्हणून वावरत होता.

नांदुरा तालुक्यात नारखेड या छोट्याशा गावात २१ अाॅगस्ट १९५० ला शेतकरी कुटुंबात श्री. फुंडकर यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले भाऊसाहेब हे सुरवातीपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेली खामगाव ते नागपूर (आमगाव) ही ३५० किलोमीटर पदयात्रा प्रचंड गाजली. कापसाला भाव मिळावा यासाठी त्यांनी तेव्हा रणशिंग फुंकले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना वयाच्या ६६ व्या वर्षी कृषिमंत्री पदासारखे महत्त्वाचे खाते मिळाले. मंत्री झाल्यानंतर त्यांनी कृषी खात्यात बऱ्याच गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न केला. येत्या ८ जुलैला त्यांना कृषिमंत्री म्हणून दोन वर्षे पूर्ण होणार होती. 

श्री. फुंडकर हे १९८९ ते ९१, १९९१ ते १९९६ आणि १९९६ ते १९९८ असे नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत अकोला मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. तत्पूर्वी त्यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघातून १९७८ आणि १९८० ला आमदार म्हणून विजय मिळवला. खासदारकीनंतरचा काळ ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. या काळात त्यांनी परिषद विरोधी पक्षनेते पद सांभाळले. युतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात त्यांचा सुरवातीलाच शपथविधी होईल असे वाटत होते; परंतु त्यांना मंत्रिपदासाठी थांबावे लागले.

मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर मंत्रिमंडळ फेररचनेत फुंडकर यांचा समावेश झाला. तेव्हापासून फुंडकर यांनी कृषिमंत्री म्हणून काम सुरू केले होते. गेल्या काळात झालेल्या शेतकरी अांदोलनात सामोपचार घडविण्यात त्यांनी पडद्यामागून मोठी भूमिका निभावली होती. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुलगा अाकाश यांना पक्षाचे तिकीट मिळवले अाणि अशक्य म्हटला जाणारा विजय खामगाव विधानसभा मतदारसंघात मिळवून धक्का दिला. 
फुंडकरांनी राजकीय जीवनात राजकीय चढ-उतारसुद्धा अनुभवले. प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्या साथीने ते राजकीय व्यासपीठांवर वावरत होते. पश्चिम विदर्भात त्या काळात अतिशय प्रभावी नेते म्हणून त्यांची गणना केली जायची.

अकोल्याचे तीन वेळा खासदार राहिलेेले फुंडकर ज्या-ज्या वेळी निवडून आले त्या वेळी केंद्रात भाजपची सत्ता आली नाही. ज्या वेळी त्यांचा पराभव झाला, त्या वेळी सत्ता आली, असा इतिहास तयार झाला. राज्यात भाजप दोन वेळा सत्तेवर येऊनही त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. अखेरीस २०१६ मध्ये हे भाग्य उजळले खरे.. मात्र ही कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची ‘एक्झिट’ झाली. वऱ्हाडात टेक्सस्टाइल पार्क उभे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी खामगावजवळ १०० हेक्टर जागाही त्यांनी निवडली होती. 

फुंडकर यांचा परिचय

 • संपूर्ण नाव ः पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर
 • जन्म ः  २१ ऑगस्ट १९५० 
 • जन्मस्थळ : नारखेड ता. नांदुरा, जि. बुलडाणा
 • शिक्षण ः एम. ए. इकॉनॉमिक्‍स (भाग १)
 • वैवाहिक जीवन - पत्नी, दोन मुले, मुलगी

फुंडकर यांचा कार्यकाळ...

 • लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक
 • महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता
 • १९७४ मध्ये जनसंघाच्या युवा आघाडीचे जिल्हा चिटणीस
 • १९७५ च्या आणीबाणीच्या काळात कॉलेज सोडून भूमिगत राहत जनजागृती केली
 • १९७६ मध्ये आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला आणि अटक झाली. अकोला कारागृहात तीन महिने कारावास भोगला. कारागृहातून सुटल्यावर मिसामध्ये अटक. ठाण्याच्या तुरुंगात ९ महिने मिसाबंदी म्हणून कारावास
 • १९७७ तुरुंगातून सुटका व जनता पार्टीचा सक्रीय कार्यकर्ता

राजकीय कारकीर्द

 • १९७८ मध्ये खामगाव विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर निवड
 • १९८० मध्ये खामगावमधून विधानसभेवर
 • १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून तीन वेळा खासदार म्हणून विजय
 • सन २००२, २००८ आणि २०१४ मध्ये विधान परिषेदत
 • ११ एप्रिल २००५ ते डिसेंबर २०१२ पर्यंत विधान परिषद विरोधी पक्षनेता
 • ८ जुलै २०१६ रोजी राज्याचे कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली

पक्षीय जबाबदाऱ्या

 • १९७७-१९७८ ः खामगाव तालुका, जनता पाटील सरचिटणीस
 • १९८०ः युवा मोर्चाचे प्रदेश सचिव
 • १९८० ते ८२ ः युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
 • १९८२ ते ८४ ः युवा मोर्चाचे प्रदेश सचिव
 • १९८४ ते ८८ ः युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस
 • १९८८ ते ९२ ः युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
 • १९९२ ते १९९९ ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष
 • २००० ते २००३ ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष
 • १९९६ मध्ये महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे मुख्य प्रशासक

शेतकऱ्यांसाठी कार्य
खामगाव ते नागपूर विधान भवन अशी ३५० किलोमीटर पायी यात्रा काढली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला. 

परदेश दौरे
    मॉस्को (रशिया), ताश्‍कंद, हाँगकाँग, बॅंकाॅक, जकार्ता बाली, सिंगापूर, मलेशिया, नेपाळ, जर्मनी, नेदरलॅंड, फ्रान्स, इटली, इस्राईल, स्वीत्झर्लंड
 

इतर अॅग्रो विशेष
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...