agriculture news in Marathi, Pandurang Fundkar says government will support organic farming, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय शेतीला पाठबळ देणार : पांडुरंग फुंडकर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सिंदखेडाराजा, जि. बुलडाणा  : आज पोषक अन्न प्रत्येकाला हवे आहे. ते सेंद्रिय शेतीमधून मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. यासाठी शासन तुम्हाला पाठबळ देईल, असे मत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.

सिंदखेडाराजा, जि. बुलडाणा  : आज पोषक अन्न प्रत्येकाला हवे आहे. ते सेंद्रिय शेतीमधून मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. यासाठी शासन तुम्हाला पाठबळ देईल, असे मत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.

गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्या वतीने अायोजित शेतकरी जागर यात्रेचे सोमवारी (ता.१५) सिंदखेडराजा येथे उदघाटन करण्यात अाले. विदर्भात सिंदखेडराजा ते वर्धा अाणि अहेरी (जि. गडचिरोली) ते वर्धा अशा एकाचवेळी दोन यात्रा काढण्यात येत अाहेत. या यात्रेचे उदघाटक म्हणून श्री. फुंडकर सिंदखेडराजा येथे बोलत होते. सुरवातीला कृषिमंत्री फुंडकर यांच्या हस्ते या यात्रेचे उदघाटन झाले. 

श्री. फुंडकर पुढे म्हणाले, की देशात गेल्या ५० वर्षांच्या काळात हरितक्रांतीच्या नावाखाली रासायनिक शेतीला प्रोत्साहन देण्यात अाले. यामुळे अनेक विपरीत परिणाम घडले. अाता शेतकऱ्यांना पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याकडे वळविण्यासाठी भारतीय गोवंश संवर्धन परिषद जनजागृतीसाठी पुढाकार घेत अाहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत बिघडला. त्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होत आहेत. यासाठी सेंद्रिय शेती ही फायदेशीर आहे. 

कार्यक्रमाला सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल, शेतकरी जागर यात्रेचे संयोजक अमोल अंधारे, नारायण महाराज शिंदे, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सनद गुप्ता, शेतकरी यात्रा प्रमुख दिवाकर नेरकर, जिल्हा सेंद्रिय शेती कंपनीचे समाधान शिंगणे, उद्धव हिवराळे प्रामुख्याने उपस्थित    होते.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...