agriculture news in Marathi, pandurang phundkar says, will help to paddy and bowl worm effected farmers, Maharashtra | Agrowon

धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग फुंडकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील कापसाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत ४ लाख ९० हजार हेक्टरवर ५ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आली आहे. त्यांना बियाणे कंपन्यांकडून भरपाई मिळवून दिली जाईल. तसेच पंतप्रधान पीक विमा आणि केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधूनही शेतकऱ्यांना मदत देण्याचे धोरण आहे, अशी घोषणा कृषिमंत्री फुंडकर यांनी गुरुवारी (ता. १४) विधानसभेत केली. 

नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील कापसाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत ४ लाख ९० हजार हेक्टरवर ५ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आली आहे. त्यांना बियाणे कंपन्यांकडून भरपाई मिळवून दिली जाईल. तसेच पंतप्रधान पीक विमा आणि केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधूनही शेतकऱ्यांना मदत देण्याचे धोरण आहे, अशी घोषणा कृषिमंत्री फुंडकर यांनी गुरुवारी (ता. १४) विधानसभेत केली. 

धान उत्पादक शेतकऱ्यांना तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानीपोटीही मदत दिली जाईल, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतीशी संबंधित प्रश्नांवर सत्ताधारी आमदारांकडून मांडण्यात आलेल्या २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

कृषिमंत्री म्हणाले, की निकृष्ट बियाण्यांप्रकरणी राज्य सरकारने बियाणे कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. कोणत्याही कंपनीला पाठीशी घालण्यात आलेले नाही. येत्या दोन महिन्यांत कृषीतील जिल्हा अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषिसेवकांची रिक्त पदे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठांमधील ५० टक्के पदे भरत आणली आहेत. तसेच निकष पूर्ण न करणाऱ्या राज्यातील सुमारे ५० कृषी महाविद्यालयांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कापसाला एकरी २५ हजारांची मदत जाहीर करा, अशी मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रमाणित नसलेले हर्मिसाइड टॉलरंट (एचटी) व्हरायटीचे बियाण्याची अवैधरीत्या राज्यात ८ लाख ५० हजार हेक्टरवर लागवड झाल्याने बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. या बियाण्याची अवैध विक्री झाली असल्याने आता ही मदत कोण करणार? राज्य सरकार कोणत्या कंपनीकडून याची भरपाई वसूल करणार आहे, अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...