पन्हाळा तालुक्यात पिकावर हुमणीचा उपद्रव

पन्हाळा तालुक्यात पिकावर हुमणीचा उपद्रव
पन्हाळा तालुक्यात पिकावर हुमणीचा उपद्रव

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील शिवारांमध्ये हुमणीचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. भात, ऊस, भुईमुगासोबतच भाजीपाला पिके हुमणीमुळे कोमेजू लागली आहेत.

जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस कमी झाल्यापासून हुमणी सर्वच पिकांमध्ये वाढली असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांची शेतातील सर्व पिकेच कोमेजल्याचे चित्र आहे. रासायनिक कीटकनाशके वापरूनही हुमणी आटोक्यात येत नाही. उसाचा बुडखा हाताने अलगद उपडता येतो इतकी त्याची मुळे हुमणीने कुरतडली आहेत. तजेलदार पिके अचानक कोमेजलेली दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यवलूज परिसरात कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. या वेळी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्रा. डाॅ. मोहनराव जाधव, ग्रामसेवक जयवंत पाटील, मोराजी पाटील, अमर मोरे, कृषिदूत पृथ्वीराज धुमाळ, शुभम भोसले, सौरभ आवळे, राहुल महारनवर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

पाऊस उघडल्यापासून हुमणीचा उपद्रव सगळ्याच पिकांमध्ये इतका वाढला आहे, की उसाचे पीक हाताला लागणार नाही असेच दिसते. ऊस उपटून जनावरांना खायला घालावा लागत आहे. - पांडुरंग पाटील, यवलूज

हुमणीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येताच आम्ही आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर ‘इपीएन’ आणि मेटॅरायझियम अॅनिसोप्ली या जैविक कीटकनाशकांची प्रात्यक्षिके राबविण्यास सुरवात केली अाहे. केवळ रासायनिक उपायांमुळे हुमणी आटोक्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे एकात्मिक नियंत्रणाबाबत आवश्यकतेनुसार प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे यांची व्याप्ती वाढवणार आहे. - पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com