agriculture news in Marathi, panjabrao deshmikh agriculture university had agreement with wolkite university, Maharashtra | Agrowon

‘पंदेकृवि’चा वोल्काईट विश्वविद्यालयासोबत करार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत ‘पंदेकृवि’ व इथिअोपिया येथील वोल्काईट विश्वविद्यालयादरम्यान शैक्षणिक करार झाला. या करारामुळे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इथिओपियाच्या शैक्षणिक संसाधनांचा उपयोग व तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत ‘पंदेकृवि’ व इथिअोपिया येथील वोल्काईट विश्वविद्यालयादरम्यान शैक्षणिक करार झाला. या करारामुळे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इथिओपियाच्या शैक्षणिक संसाधनांचा उपयोग व तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

शैक्षणिक मूल्यांकन तसेच विविध तंत्रज्ञानाकरिता झालेल्या या सामंजस्य करारावेळी वोल्काईट विश्वविद्यालयातर्फे सुशील सक्कलकार यांची उपस्थिती होती. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, नियंत्रक विद्या पवार, डॉ. नितीनकुमार राऊत यांची उपस्थिती होती.

वोल्काईट विश्वविद्यालयात सात महाविद्यालये असून, दीड हजार विद्यार्थी क्षमता असलेले ४६ स्नातकोत्तर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सामंजस्य करारानंतर दोन्ही विद्यापीठांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यापीठातील कृषी शिक्षणविषयक सोयीसुविधा संसाधनाचा उपयोग करता येईल व समाजाकरिता आवश्यक तंत्रज्ञान निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांनी या करारानंतर कृषी शिक्षणाशी संबंधित सर्वच विषय लक्षात घ्यावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. भाले यांनी या वेळी केले. डॉ. प्रदीप बोरकर यांनी अाभार मानले.

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...