agriculture news in Marathi, panjabrao deshmukh agricultural university will promot three varieties of soyabean and paddy, Maharashtra | Agrowon

‘पंदेकृवि’चे सोयाबीन, धानात येणार तीन वाण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे हे वाण सद्याच्या प्रचलित जेएस ३३५ पेक्षा हे जास्त उत्पादन देणारे अाहे. शिवाय या भागासाठी हे वाण वरदान ठरेल. धानामध्ये साकोली १० हे वाणसुद्धा अधिक उत्पादन देणारे चांगले वाण ठरू शकते. 
- डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला
 

अकोला : पुढील महिन्यात दापोली येथे होऊ घातलेल्या विद्यापीठांच्या संयुक्त बैठकीत (जाॅइंट ॲग्रेस्को) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे वाण, यंत्र-तंत्रासह एकूण ४२ शिफारशी ठेवल्या जाणार अाहेत. वाणांना मंजुरी मिळाली तर धानाचे दोन अाणि सोयाबीनचे एक वाण पुढील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतील.

 विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सातत्याने संशोधन करीत काळ सुसंगत असे वाण तयार करण्याचे काम हातात घेतलेले अाहे. याचे फलीत स्वरुप सोयाबीनचे एएमएस १००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) हे वाण येऊ घातले अाहे. प्रचलित वाणांपेक्षा सरस ठरणारे वाण ९५ ते १०० दिवसांत तयार होईल. यानंतर शेतकऱ्याला तेच शेत रब्बी पिके घेण्यासाठी वेळेत उपलब्ध होऊ शकेल.

सोयाबीनचा हा वाण मूळकूज, यलो मोझेक सारख्या रोगास प्रतिकारक्षम सुद्धा अाहे. त्याच्या शेंगासुद्धा फुटत नाही. हेक्टरी २१ क्विंटल ७५ किलोपर्यंत उत्पादकता या वाणापासून मिळू शकते, असे स्पष्ट करण्यात अाले. विद्यापीठाच्या अमरावती येथील संशोधन केंद्रात हा वाण तयार झाला.  

राज्यात पूर्व विदर्भ, कोकणात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या धान पिकाचेही तिलक अाणि साकोली १० हे दोन वाण अागामी संयुक्त बैठकीत प्रसारणासाठी ठेवले जाणार अाहेत. सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथील संशोधन केंद्राने बनविलेला तिलक हा वाण १४० ते १४५ दिवसांत येतो. वाऱ्यामुळे पीक जमिनीवर लोळत नाही. दाणेसुद्धा फुटणार नाहीत. या वाणाची बागायतीसाठी शिफारस असून हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादकता मिळू शकते. साकोली (जि. भंडारा) संशोधन केंद्राने ‘साकोली १०’ हा वाण तयार केले. १३३ दिवसांत उत्पादन देणारा तसेच हेक्टरी ४१ क्विंटल ८१ किलो उत्पादकता असलेला हा वाण अाहे. याची खरिपासाठी शिफारस अाहे.

 उपरोक्त तीन वाण अागामी जाॅइंट ॲग्रेस्कोमध्ये प्रसारणाच्या मंजुरीसाठी ठेवले जातील. तज्ज्ञांकडून ही मंजुरी मिळाली तर अागामी हंगामात लागवडीसाठी बियाणे मिळू शकेल. याशिवाय हरभरा (केजी१३०३) अाणि भुईमुगाचा (टीएजी ७३) हा वाण पूर्व प्रसारणासाठी बैठकीत मांडले जाणार अाहेत. यासोबतच विद्यापीठाने मूलभूत शास्त्रात दोन, उद्यान विद्या विभागात ९, उत्पादन तंत्रज्ञान प्रकारात ९, कीटकशास्त्र एक, कृषी अभियांत्रिकी १४, सामाजिक शास्त्र दोन अशा एकूण ४२ शिफारशी मांडल्या जातील.

गेल्याच अाठवड्यात विद्यापीठ स्तरावरील अाढावा बैठक संपन्न होऊन त्यात अत्यंत कटाक्षाने प्रत्येक बाब तपासून शिफारशींना ज्वाॅइंट ॲग्रेस्कोसाठी निवडण्यात अाले. यातील किती शिफारशींना मंजुरी मिळते हे अाता पुढील महिन्यात दापोली होणाऱ्या बैठकीत ठरेल. 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...