विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

अकोला कृषी विद्यापीठ
अकोला कृषी विद्यापीठ
अकोला : ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत रोजंदारी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून अांदोलन करीत अाहेत. अाता पाच जणांनी बेमुदत उपोषण सुरू केले अाहे. अद्यापही प्रशासनाने अांदोलनाची दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत अाहे.
 
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मागील ३० वर्षांपासून काम करीत अाहेत. विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात (९ अाॅगस्ट) कामबंद अांदोलन सुरू केले. त्यानंतर लाक्षणिक उपोषण व अाता बेमुदत उपोषण असे हे अांदोलन होत अाहे. 
 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले रोजंदारी मजूर गेल्या अनेक वर्षांपासून ‘समान काम, समान वेतन’ देण्याची मागणी प्रशासनाकडे करीत अाहेत. वेळोवेळी झालेल्या अांदोलनानंतर त्यांना अाश्वासन मिळाले. परंतु, कार्यवाही झालेली नाही. केंद्र शासनाने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे समान काम समान वेतन घेण्याचा अधिकार अाहे. इतर विद्यापीठात हे वेतन दिल्या जात असल्याचे कामगारांचे म्हणणे असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी मजुरांना समान वेतन मिळत नाही.
 
याबाबत विद्यापीठ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत मजुरांनी कामबंद अांदोलन सुरू केले अाहे. कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्याने विद्यापीठाअंतर्गत प्रक्षेत्रावर या हंगामात लागवड केलेल्या पिकांच्या काढणीसह इतर कामांवर मोठा परिणाम झालेला अाहे. विद्यापीठाला प्रचंड नुकसान सोसावे लागत अाहे.
या अांदोलनाला अाजवर विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून अाता अामदार बच्चू कडू समर्थित ‘प्रहार’ संघटनासुद्धा पाठिशी उभी राहिली अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com