agriculture news in marathi, panjabrao patil demands MOCA to sugar factories | Agrowon

साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावा : पंजाबराव पाटील
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सातारा : साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत साखर कारखानदार आता ठरलेला भाव देण्यास नकार देत आहेत. ही बाब दुर्दैवी असून, साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे.

सातारा : साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत साखर कारखानदार आता ठरलेला भाव देण्यास नकार देत आहेत. ही बाब दुर्दैवी असून, साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन दिल्याचे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, की ऊस उत्पादकांसमवेत झालेल्या बैठकीत पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी मान्य केले होते. पण, आता साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत आता तेच कारखानदार दोन ते अडीच हजार रुपये दर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तीन महिने झाले तरी जिल्ह्यातील कारखानदारांनी बिले काढली नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे. 

हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉँग्रेस शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. परंतु, त्यांची भूमिका दुटप्पी वाटते. कारण जिल्ह्यातील बहुतांश कारखाने हे पक्षाच्या विचाराच्या प्रतिनिधींचे आहेत. मंगळवारी (ता. ६) झालेल्या या पत्रकार परिषदेस बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सातारा तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, खटाव तालुकाध्यक्ष संदीप बुधवाळे, माण तालुकाध्यक्ष विकास नरळे उपस्थित होते.

इतर बातम्या
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...