agriculture news in Marathi, panjabrav deshmukh agriculture university golden jubly starts from Sunday, Maharashtra | Agrowon

‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा रविवारी प्रारंभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला शनिवारी (ता. २०) ५० वर्षे पूर्ण होत अाहेत. यानिमित्त संपूर्ण वर्षभर ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ साजरे केले जाणार असून, याचा प्रारंभ रविवारी (ता. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार अाहे. 

अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला शनिवारी (ता. २०) ५० वर्षे पूर्ण होत अाहेत. यानिमित्त संपूर्ण वर्षभर ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ साजरे केले जाणार असून, याचा प्रारंभ रविवारी (ता. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार अाहे. 

विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण तथा संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा. अॅड. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, अामदार, विद्यापीठाचे माजी कुलगुरू व इतर उपस्थित राहणार अाहेत. 

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले अाहे. 

शेतकरी हिताच्या अनेकानेक उपक्रमांची रेलचेल राहणार असून विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, मेळावे, प्रशिक्षणे, प्रक्षेत्र भेटी, संमेलने आदींचे नियोजन करण्यात आले असून, गाव पातळीपासून तर आंतर राष्ट्रीय स्तरावर उपक्रम होणार आहेत.

शनिवारपासून शिवार फेरी
विद्यापीठ स्थापना दिवसाचे औचित्य साधत दरवर्षी शिवारफेरीचे आयोजन केले जाते. याही वर्षी ही शिवारफेरी शनिवार (ता. २०)पासून सुरू होत अाहे. २२ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ही फेरी घेतली जाईल. शेतकऱ्याच्या सोयीसाठी शिवारफेरीचा जिल्हानिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी चंद्रपूर, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्हा, रविवारी (ता. २१) अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती तर सोमवारी यवतमाळ, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होऊ शकतील. दुपारी ४ ते ६ या वेळेत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी आधुनिक व कालसुसंगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शिवारफेरीत प्रत्यक्ष बघावे व आपल्या शंकांचे समाधान करून घेत फायद्याची शेती तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...