agriculture news in marathi, Pankaja Munde, Sirpanch darbar in mantralaya | Agrowon

ग्रामविकासाची चळवळ गतिमान करा : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : ग्रामविकासाची चळवळ गतिमान करा असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे उपस्थित राज्यभरातील सरपंचांना केले. ग्रामविकास विभागामार्फत आयोजित केलेला सरपंच दरबार मंत्रालयात पार पडला. ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सरपंच दरबारास राज्यभरातील सुमारे २०० सरपंचांनी उपस्थिती लावून आपल्या भागातील विविध प्रश्न मांडले.
 

मुंबई : ग्रामविकासाची चळवळ गतिमान करा असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे उपस्थित राज्यभरातील सरपंचांना केले. ग्रामविकास विभागामार्फत आयोजित केलेला सरपंच दरबार मंत्रालयात पार पडला. ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सरपंच दरबारास राज्यभरातील सुमारे २०० सरपंचांनी उपस्थिती लावून आपल्या भागातील विविध प्रश्न मांडले.
 
सरपंचांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने मंत्री पंकजा मुंडे यांनी मागील महिन्यापासून सरपंच दरबार हा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हा सरपंच दरबार होतो. हा दुसरा सरपंच दरबार होता. यात सहभागी सरपंचांनी विशेष करून घरकुल योजनेत येणाऱ्या अडचणी, चौदाव्या वित्त आयोगातून मिळणारा निधी, ग्रामसभांमधील प्रश्न, ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असलेले अधिकचे मनुष्यबळ, सरपंचांची मानधनवाढ, ग्रामपंचायतींसाठी इमारतींची आवश्यकता असे विविध प्रश्न या वेळी मांडले. नव्याने नियुक्त महिला सरपंचांनीही गावातील विविध प्रश्न या वेळी मंत्र्यांसमोर सादर केले.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्रत्येक बेघराला घर देण्याचा सरकारचा निर्धार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून हे लक्ष्य पूर्ण केले जाईल. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून लोकांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मोठा निधी गावांना उपलब्ध करून दिला जात आहे. गावे ब्रॉडबँड तथा वायफायने जोडण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. स्वच्छता, मनरेगा यासाठीही भरीव निधी गावांना मिळत आहे. या सर्व योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी गावांचा सर्वांगीण विकास करावा. सरपंचांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांवर, तसेच सादर केलेल्या सर्व निवेदनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

सरपंच दरबारास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी राज्याच्या विविध भागांतून आलेले सरपंच भास्कर पेरे-पाटील, डॉ. सूरज पाटील, अनंत ठाकरे, नरेंद्र पाटील, रेश्मा देशमुख, संतोष राणे यांनी सरपंचांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

सरपंच पतींचा गोंधळ...
सरपंच दरबारासाठी आलेल्या महिला सरपंचांच्या पतिराजांना सभागृहात सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे सहाव्या मजल्यावर त्यांनी गोंधळ घातला. खुद्द ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी निरोप पाठवून महिला सरपंचांच्या पतिराजांनी माझ्या केबिनमध्ये बसवावे असे सांगितल्यानंतर सुरक्षारक्षकांनी या पतिराजांना तेथून बाहेर काढले.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...