आंदोलनकर्त्या बळीराजाची भूक पनवेलकर शमवणार

आंदोलनकर्त्या बळीराजाची भूक पनवेलकर शमवणार
आंदोलनकर्त्या बळीराजाची भूक पनवेलकर शमवणार

ठाणे:-देशातील जनतेचं पोट भरण्यासाठी रात्रंदिवस राबणारा शेतकरी बांधव आज स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. पाच दिवस पायपीट करत १८० किमीहून अधिक अंतर कापत मुंबईत दाखल झालेल्या या शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या जेवणाचं काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर इथे मिळेल. शेतकरी बांधवांसाठी पनवेल आणि आसपासच्या गावांमधून तब्बल १ लाख भाकऱ्या आणि ५०० किलो सुकट असं भोजन ग्रामस्थांनी बनवून मुंबईकडे रवाना केलं आहे.

शेतकरी कामगार पक्षानं (शेकाप) शेतकऱ्यांच्या या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्थानिक सरपंचांना सांगून भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत. प्रत्येक सरपंचाला भाकऱ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि त्यांनीही ते आनंदानं स्वीकारलं. त्यानुसार १ लाख भाकऱ्या बनविण्यात आल्या आहेत. त्याचं संकलन करण्यात आलं आहे. तसेच कर्नाळा स्पोर्टस क्लबजवळ सुकटीचे कालवण बनवून ते मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. हे भाकऱ्या आणि सुकटीचे कालवण घेऊन निघालेले ट्रक लवकरच मुंबईत दाखल होतील.

दरम्यान, याआधी मुंबईकरांनी देखील पाणी, बिस्किट तसेच काही ठिकाणी अन्न पदार्थांचे वाटप करून शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com