सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्री

सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्री
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्री

जळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा. या दरात उत्पादक आपल्या पपईची विक्री करतील. काढणी सुरू होईल, असा निर्णय शहादा (जि. नंदुरबार) येथील शेतकरी व इतरांच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु जळगावमधील यावल, चोपडा व रावेरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार पपईला किमान १० रुपये प्रतिकिलोचा दर हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  पपईच्या दरांवरून शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद सुरू होता. हा वाद मागील सात ते आठ दिवस सुरूच असल्याने पपईची काढणी ठप्प होती. शहादा येथील शेतकऱ्यांनी १३ रुपये प्रतिकिलो दरांची मागणी केली होती. शहादा येथील बाजार समिती व शिरपुरात या विषयावरून बैठका झाल्या. शहादा येथील बैठकीत व्यापाऱ्यांनी सहा रुपये प्रतिकिलोचा दर देऊ, असे सांगितले. त्यावर तोडगा निघाला नाही. दरांचा वाद चिघळत असतानाच शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने हस्तक्षेप केला नाही. बागांमध्ये फळांची वाढ व घसरता दर्जा लक्षात घेऊन शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. १२) शहादा येथे व्यापाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यात संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनःश्‍याम चौधरी, शेतकरी अनिल पटेल, बापू पाटील, लड्डूभाई पटेल, श्रीराम पाटील, भय्याभाई पाटील, अनिल पाटील, कांतीलाल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते. त्यात सव्वाआठ रुपये दरांवर एकमत झाले. शहादा व शिरपुरातील शेतकऱ्यांनी या दरांबाबत सहमती दर्शविली आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल व रावेरातील पपई उत्पादकांनी १० रुपये दर दर्जेदार फळांना हवा. दुय्यम फळांच्या खरेदीसंबंधी कमी अधिक दर घेता येतील, असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com