agriculture news in Marathi, Papaya harvesting stopped due to rate issue, Maharashtra | Agrowon

दराच्या तिढ्यामुळे खानदेशात पपईची काढणी ठप्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

धुळे ः पपईच्या दराचा तिढा निर्माण झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील पपईची तोडणी किंवा काढणी शेतकऱ्यांनी बंद ठेवली आहे. जोपर्यंत व्यापारी आठ रुपये प्रतिकिलोचा दर देणार नाहीत, तोपर्यंत शेतातून पपईची तोडणी होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

धुळे ः पपईच्या दराचा तिढा निर्माण झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील पपईची तोडणी किंवा काढणी शेतकऱ्यांनी बंद ठेवली आहे. जोपर्यंत व्यापारी आठ रुपये प्रतिकिलोचा दर देणार नाहीत, तोपर्यंत शेतातून पपईची तोडणी होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पपईची तापी काठावरील गावांमध्ये लागवड अधिक आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यात तऱ्हाडी, निमझरी, बलकुवे, अर्थे आदी भागात पपईची लागवड अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्‍यातील मनरद, नांदरखेडा, प्रकाशा, वडछील, म्हसावद, जयनगर, मोहिदे आदी भागात पपई लागवड आहे. नंदुरबार तालुक्‍यातील समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, पिंपळोद भागात लागवड आहे.

मागील महिनाभरापासून पपई दरांचा तिढा या भागात आहे. व्यापारी शहादा व शिरपूर बाजार समितीला जुमानत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतातच किंवा जागेवरच आठ रुपये प्रतिकिलो दर हवा आहे. व्यापारी पाच रुपये ५५ पैसे प्रतिकिलो, असा दर पपईला देत आहेत. व्यापारी जो दर देत आहेत, तो शेतकऱ्यांना मान्य नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...
दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ,...अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...