agriculture news in marathi, papaya rate issue, nandurbar, maharashtra | Agrowon

पपई दरासाठी समिती स्थापन प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

नंदुरबार : पपई दरांबाबत प्रकाशा (ता. शहादा) येथे झालेल्या एका संघटना व शेतकऱ्यांच्या बैठकीत जयनगर व वडाळी (ता. शहादा) येथील दोन शेतकऱ्यांनी संघटनेच्या समिती गठित करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला. यातच काही दिवसांपूर्वी पपईचे दर ४.२५ रुपये प्रतिकिलो असे ठरले आहे. याबाबत प्रशासनाने सूचना दिलेल्या असतानाही निर्देशित दरात खरेदी केली जात नसल्याच्या तक्रारी पपई उत्पादकांमध्ये आहेत. 

नंदुरबार : पपई दरांबाबत प्रकाशा (ता. शहादा) येथे झालेल्या एका संघटना व शेतकऱ्यांच्या बैठकीत जयनगर व वडाळी (ता. शहादा) येथील दोन शेतकऱ्यांनी संघटनेच्या समिती गठित करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला. यातच काही दिवसांपूर्वी पपईचे दर ४.२५ रुपये प्रतिकिलो असे ठरले आहे. याबाबत प्रशासनाने सूचना दिलेल्या असतानाही निर्देशित दरात खरेदी केली जात नसल्याच्या तक्रारी पपई उत्पादकांमध्ये आहेत. 

बैठकीत जे शेतकरी उपस्थित आहेत, त्यांना गृहीत धरून किंवा समोर ठेवून चर्चा करा. जे शेतकरी घरी आहेत, त्यांची समितीत नियुक्ती करू नका किंवा त्यांचा मुद्दा बैठकीत घेवू नका, असा मुद्दा या दोन्ही शेतकऱ्यांनी मांडला. यावरून किरकोळ शाब्दिक वादही झाला. शेतकऱ्यांच्या संघटनेने मात्र पपई उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या समितीत केला जाईल. शेतकरी कुठेही असोत, ते पपईसंबंधीच्या आंदोलनात असल्याने त्यांना आपण स्थान दिले पाहीजे, असा मुद्दा मांडला. काही वेळेनंतर हा वाद थांबला. 

`पपईचे दर ४.२५ रुपये, अंमलबजावणी करावी`
पपईचे दर प्रतिकिलो ४.२५ रुपये असे नुकतेच निश्‍चित झाले आहेत. या दरांची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांनी अपेक्षित दरांसाठी आपला स्वतंत्र दबाव गट तयार केला पाहिजे. पपई दराबाबतचे आंदोलन हे कुणी एका गटाचे, संघटनेचे नसून, त्यात सर्वांचा समावेश करावा, असा मुद्दा पपई उत्पादकांनी मांडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...