agriculture news in marathi, papaya rate issue solved in Dhule | Agrowon

नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पपई दराचा तिढा अखेर सुटला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

धुळे : नंदुरबार व धुळे जिल्ह्यात पपईच्या दरांवरून सुरू असलेला तिढा नुकत्याच झालेल्या शेतकरी व व्यापारी यांच्यासोबतच्या बैठकीत सुटला. सहा रुपये ७५ पैसे प्रतिकिलो या दरावर एकमत झाले असून, पपईची काढणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

धुळे : नंदुरबार व धुळे जिल्ह्यात पपईच्या दरांवरून सुरू असलेला तिढा नुकत्याच झालेल्या शेतकरी व व्यापारी यांच्यासोबतच्या बैठकीत सुटला. सहा रुपये ७५ पैसे प्रतिकिलो या दरावर एकमत झाले असून, पपईची काढणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

पपईला कमी दर मिळत असल्याने पपई उत्पादकांच्या समितीने काढणीला विरोध केला होता. पपई उत्पादकांनी प्रतिकिलो आठ रुपये दर मिळावा, अशी मागणी बाजार समितीसह पपई खरेदीदार व्यापाऱ्यांकडे केली होती. फक्त पाच रुपये प्रतिकिलो, असा दर व्यापारी देत होते. मागील महिन्यात एका बैठकीचे आयोजन शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये करण्यात आले होते, परंतु या बैठकीला व्यापारी, खरेदीदार अनुपस्थित राहीले. यामुळे दरांचा तिढा आणखीच वाढला आणि शेतकऱ्यांनी पणनमंत्री व इतर वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रार करण्याची तयारी केली होती. 

शेतकऱ्यांचा पवित्रा लक्षात घेता व्यापाऱ्यांनी नरमाई दाखवित बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी केली. अखेर शहादा येथील बाजार समितीमध्ये बैठक घेण्यात आली. व्यापाऱ्यांनी सुरवातीला सहा रुपये प्रतिकिलो दर सांगितला, पण तो शेतकऱ्यांनी नामंजूर करीत सात रुपये २५ पैसे प्रतिकिलो किमान दर हवा, अशी भूमिका मांडली. त्यावर व्यापाऱ्यांनी तोडगा काढत सहा रुपये ७५ पैसे प्रतिकिलो, असा दर देण्याची तयारी दाखविली. त्यावर कमाल शेतकऱ्यांनी होकार दिला. दरांचा तिढा मिटवून पपईची काढणी सुरू झाली आहे. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशात पपईची निर्यात सुरू झाली आहे. 

पपईला खर्चाच्या तुलनेत दर हवे आहेत. किरकोळ बाजारात तर २५ रुपये किलो या दरात विक्रेते पपई देतात. शेतकऱ्याकडून कवडीमोल दरात पपई खरेदी होते. या संदर्भात संशोधन करून कारवाई व्हावी. 
- रोहित पाटील, पपई उत्पादक, वडछील, ता. शहादा, जि. नंदुरबार

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...