agriculture news in Marathi, Papaya rate problem in Jalgaon, Maharashtra | Agrowon

पपई दरांबाबत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून कोंडी सुरुच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 डिसेंबर 2018

धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत आहे. या प्रकाराकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असून, व्यापारी मनमानी करीत आहेत. मागील ४५ दिवसांत पपईचे दर १४ ते १६ रुपये प्रतिकिलोवरून तीन रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. आता उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. प्रशासनाने हस्तक्षेप करून ही अडचण दूर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत आहे. या प्रकाराकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असून, व्यापारी मनमानी करीत आहेत. मागील ४५ दिवसांत पपईचे दर १४ ते १६ रुपये प्रतिकिलोवरून तीन रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. आता उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. प्रशासनाने हस्तक्षेप करून ही अडचण दूर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

पपईचे दर दोन दिवसांपूर्वी पाच ते चार रुपये प्रतिकिलो, असे थेट जागेवरच शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु दोन दिवसांत पुन्हा दर कमी करण्यात आले असून, तीन रुपये प्रतिकिलो, असे दर व्यापाऱ्यांनी केले आहेत. दर कुठलीही बाजार समिती जाहीर करीत नाही. शहादा (जि. नंदुरबार) व मध्य प्रदेशातील व्यापारी दर ठरवीत असून, कमी दरात पपई दिली नाही तर खरेदीच ठप्प करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जे खरेदीदार आहेत, त्यांच्याकडून शिरपूर व धुळे (जि. धुळे), शहादा, नंदुरबार या बाजार समित्यांनी अनामत रक्कम गोळा करणे, त्यांच्याकडे खरेदीचे परवाने आहेत की नाही, हे तपासणे बंधनकारक आहे.

परंतु व्यापारी सर्रास कुठल्याही परवान्याशिवाय खरेदी करीत आहेत. राजस्थान, दिल्ली येथे शहादा, शिरपूर, बऱ्हाणपूर, बडवानी (मध्य प्रदेश) येथील व्यापारी पपई पाठवित आहेत. बाजार समित्यांना सेस मिळत नाही, म्हणून बाजार समित्या या खरेदीसंबंधी नियंत्रण आणायला तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून, पुढे फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

सध्या धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा व शिरपुरात तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्‍यांत पपईची काढणी अधिक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावलमध्ये पपई बागांमध्ये काढणी 
सुरू आहे. परंतु तीन व चार रुपये दर परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...
कोल्हापुरात टोमॅटोच्या दरात वाढकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...