agriculture news in marathi, Paper overlays work on Grape | Agrowon

द्राक्षघडांवर पेपर आच्छादन कामांना वेग
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

नाशिक : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रियेत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागांतील द्राक्षघडांना पेपर आच्छादन करण्याच्या कामाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, यापैकी बहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाऱ्या द्राक्षबागा आहेत.

नाशिक : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रियेत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागांतील द्राक्षघडांना पेपर आच्छादन करण्याच्या कामाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, यापैकी बहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाऱ्या द्राक्षबागा आहेत.

युरोप, रशिया, चीन, बांगलादेश व इतर देशांत द्राक्ष निर्यात करण्याचा या भागाचा नावलौकिक आहे. दरम्यान निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यापेक्षा द्राक्ष निर्यात करताना अनेक चाळणी प्रक्रियेच्या माध्यमातून उत्पादकांना जावे लागते. द्राक्षातील साखरेचे प्रमाण, आकारमान, रंग, वजन, दर्जा याकडे विशेष लक्ष उत्पादकांना द्यावे लागते. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव व्हावा, याकरिता सध्या द्राक्ष घडांना पेपर आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे.

एका एकर क्षेत्रात आच्छादनासाठी इंग्रजी पेपरची 30 ते 40 बंडल लागतात. एका बंडलची किमत 200 रुपये असून पेपर लावण्याची मजुरी एकरी दहा हजार इतकी आहे. तसेच मणी काढण्याची मजुरी एकरी 5 ते 7 हजार रुपये आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, ननाशी या आदिवासी भागांबरोबर स्थानिक मजुरांकडून हे काम करून घेण्यात येते. निर्यात होणाऱ्या द्राक्षांचा रंग हिरवा असावा लागतो. पेपर आच्छादन केले तरच हा रंग टिकून राहतो. त्यामुळे 18 ते 20 ब्रिक्स (साखरेचे) प्रमाण राहून नैसर्गिकपणा टिकून राहतो. दरम्यान एक महिन्याच्या कालावधीपर्यंत आच्छादन ठेवावे लागते.

स्थानिक ठिकाणाबरोबर परराज्यांत द्राक्ष विक्री करावयाची असल्यास पिवळसर रंगाची द्राक्षे विक्रीसाठी योग्य समजली जातात. त्यात साखरेचे प्रमाण 22 ते 24 असावे लागते. अशी माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. निर्यातीसाठी 16 ते 20 इतके आकारमान आवश्यक असते. निर्यातीसाठी 5 किलो द्राक्षाचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद, पुणे, ठाणे येथे पाठविण्यात येतात. यशस्वी चाचणी अहवालाचा रिपोर्ट सहाव्या दिवशी येतो. त्यानंतर निर्यात प्रक्रिया सुरू होते, अशी माहिती उत्पादकांनी दिली.

इतर बातम्या
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत...म्हसवड, जि. सातारा : भीषण दुष्काळामुळे चारा व...
`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`नाशिक : येवला, मनमाड व ३८ गावे पाणीपुरवठा...
सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के...सांगली ः ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील लघु...
निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान'नागपूर  : शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये...
काटोल पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च...
मातेरेवाडीत द्राक्षबाग कोसळून लाखोंचे...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
‘पोक्रा’आचारसंहितेच्या कचाट्यातनांदुरा, जि. बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात...
मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ लाख ७२ हजार ५५२...
कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी...कोयनानगर, जि. सातारा ः शासनाने कोयना धरणाच्या...
दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत...पुणे ः मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांना (पीपल...
परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...