Agriculture news in marathi, PAPI Cultivation of the farmers is better than the pepper | Agrowon

शेतक-यांची मिरचीपेक्षा पपई लागवडीला पंसती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

मिरची लागवड १२ जुलैपर्यंत होईल. फारसे क्षेत्र यंदा कमी होणार नाही. आमच्या भागात लागवड कायम आहे. यंदा ओल्या लाल मिरचीला चांगले दर मिळतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
- भरत पटेल,
मिरची उत्पादक, पाचोराबारी


कापसाचे क्षेत्र कमी व पपईचे क्षेत्र अधिक दिसत आहे. काही मिरची उत्पादकांनी पपईला पसंती दिली आहे. परंतु, मिरचीचे क्षेत्र फारसे कमी होणार नाही. अजून लागवड सुरू आहे.
- आर. एम. पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदे (जि. नंदुरबार)

नंदुरबार : ऐन लागवडीच्या वेळेस पावसाचा लहरीपणा, रोगराईमुळे वाढलेला उत्पादन खर्च आणि कापसाचा पर्याय आदी कारणांमुळे जिल्ह्यात मिरचीची लागवड कमी होत असून, यंदा सलग तिसऱ्या वर्षी या पिकाची लागवड ६०० ते ६५० हेक्‍टरवर राहील. तर, पपईसह कापूस लागवडीला यंदा शेतकऱ्यांची पसंती मिळत असून पपईचे क्षेत्र यंदा शहादा व नंदुरबारात सुमारे ४ ते ५ हजार हेक्‍टरपर्यंत पोचल्याचा अंदाज आहे.  

खानदेशात सर्वाधिक मिरची लागवड नंदुरबार व शहादा तालुक्‍यांत अधिक असते. येथील मिरची पावडर देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविली जाते. २० जून ते १२ जुलैपर्यंत लागवड सुरू असते.  ढगाळ वातावरण व कमी तापमान लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचनाच्या बळावर लागवड केली आहे. मागील हंगामात नंदुरबारातील गोदांमध्ये कोरडी मिरची मोठ्या प्रमाणात पडून होती. दरही पडले होते. या भीतीने मागील वर्षी लागवड फक्त ११०० हेक्‍टरपर्यंत होती. यंदाही सुमारे १ हजार हेक्‍टरपर्यंत लागवड झाली आहे. ती फारशी वाढणार नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मिरचीला एकरी किमान ६० ते ६५ हजार रुपये खर्च येतो. मागील दोन हंगाम मिरचीला विषाणूजन्य रोगांचा फटका बसला. मागील वर्षी तर ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडले होते. २०१५ पर्यंत लागवडीचे क्षेत्र अडीच हजार हेक्‍टरपर्यंत होते. नंतर लागवडीत घट होत गेली.

 सध्या कोरड्या मिरचीमध्ये तेजी

नंदुरबार व लोणखेडा येथे कोरड्या मिरचीसंबंधी पाच कोल्डस्टोरेज असून, त्यात फारसा साठा नाही. आंध्र प्रदेशातील (गुंटूर) मिरचीची आवक दिवाळीनंतर तर नंदुरबारमधील मिरचीची आवक ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल, असे नंदुरबारमधील मिरची व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...