परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये

परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होती. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये वालाची २ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक असताना २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ८० क्विंटल आवक होऊन १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

काकडीची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. बीट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com