agriculture news in marathi, in Parbhani 29 of the crop loan allocation | Agrowon

परभणीत खरिपात २९ टक्के पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५४ हजार ४७६ शेतकऱ्यांना ४०६ कोटी १७ लाख ३० हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २८.९९ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात १३८९ कोटी १ लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वाटप यामध्ये ९९४ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपयांची तफावत आली आहे.

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५४ हजार ४७६ शेतकऱ्यांना ४०६ कोटी १७ लाख ३० हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २८.९९ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात १३८९ कोटी १ लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वाटप यामध्ये ९९४ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपयांची तफावत आली आहे.

यंदा रब्बी हंगामात २८० कोटी ८३ लाख ४७ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. परंतु, जिल्हा बॅंक तसेच ग्रामीण बॅंक वगळता अन्य बॅंकांनी अद्याप रब्बी कर्ज वाटपास सुरवात केलेली नाही. कर्जमाफी योजनेचा पीक कर्ज वाटपावर परिणाम झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

२०१७-१८ च्या खरिप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १७५ कोटी ४० लाख २० हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ७० कोटी ९५ लाख २१ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १५४ कोटी ५५ लाख ३२ हजार रुपये असे एकूण १४०० कोटी ९० लाख ७० हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते.

खरीप हंगामातील पीक कर्जाचे ३० सप्टेंबरपर्यंत वाटप केले जाते. यंदा ५४ हजार ४७६ शेतक-यांना ४०६ कोटी १७ लाख ३० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेने ४० हजार ६८२ शेतकऱ्यांना ८७ कोटी ४३ लाख ३० हजार रुपये (४९.८५ टक्के), व्यापारी बॅंकांनी ११ हजार ८६ शेतक-यांना ३०० कोटी ३ लाख रुपये (२८.०२ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २ हजार ७०८ शेतकऱ्यांना १८ कोटी ७१ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात २८० कोटी ८३ लाख ४७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ६९ कोटी ५८ लाख ३३ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १९१ कोटी १६ लाख ५६ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २० कोटी ८ लाख ५८ हजार रुपयांंचा समावेश आहे.

कर्जमाफीच्या अपेक्षेने यंदा शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यास प्रतिसाद दिला नाही. बॅंक कर्मचारी देखील कर्जमाफी योजनेची माहिती भरण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे कर्ज वाटप कमी झाले आहे. यंदा उद्दिष्टापेक्षा ९९४ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपये कमी कर्ज वाटप झाले आहे. रब्बी कर्ज घेण्यासाठी सुध्दा शेतकरी अद्याप इच्छुक नसल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने काही शेतकऱ्यांना रब्बीचे कर्ज वाटप केले असल्याचे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.

 

इतर बातम्या
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी...