agriculture news in Marathi, Parbhani and Hingoli in reach Agriculture scientist | Agrowon

परभणी, हिंगोलीत शेतीपिकांत पोचले कृषिशास्त्रज्ञ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी या विशेष विस्तार मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञांनी आजवर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील ३० गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन याबाबत सल्ला दिला. या मोहिमेअंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच पावसाच्या खंड काळात करावयाच्या उपाययोजना यावर भर दिला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी या विशेष विस्तार मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञांनी आजवर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील ३० गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन याबाबत सल्ला दिला. या मोहिमेअंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच पावसाच्या खंड काळात करावयाच्या उपाययोजना यावर भर दिला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा विभागात सुरवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पीक संरक्षणाकरिता शेतक­ऱ्यांना शेतावर जाऊन सल्ला देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रे, सर्व महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन योजना तसेच कृषी विभाग यांच्या सहकार्याने `विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी` ही विशेष विस्तार मोहीम राबविण्‍यात येत आहे. 

त्यासाठी वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृती आराखडा करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावांची निवड करण्यात आली. आजपर्यंत या दोन जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३० गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन चर्चेद्वारे सल्ला देण्यात आला. 

परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूचे प्रमुख डॉ. यू. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आहेत. चमूमध्ये कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ज्ञांचा समावेश आहे. याअंतर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. माळधानी (ता. जि. हिंगोली) येथील शेतावर विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रदीप इंगोले, कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे, उपविभागीय अधिकारी बी. एच. कच्छवे यांनी भेट देऊन हळद पिकांची पाहणी केली.

मागणी अाधारित काटेकोर विस्तार शिक्षण ः इंगोले
हंगामी खरीप पिके, ऊस, फळपिके, भाजीपाला आदी पिकांचे संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. खास करून सध्याच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पीक व्यवस्थापन, पीक संरक्षणामध्ये प्रामुख्याने बोंड अळी व्यवस्थापन यावर शेतक­ऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे. मागणी अाधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे मोहिमेचे स्वरूप आहे, असे इंगोले यांनी सांगितले.

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...