agriculture news in marathi, Parbhani area visit to scientists of Central Cotton Research Institute | Agrowon

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची परभणीत प्रक्षेत्र भेट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

परभणी ः नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतावर जाऊन सद्यःस्थितीतील कपाशीच्या पिकांची पाहणी केली.

जिल्ह्यातील कपाशीवर आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सद्यःस्थितील कपाशीची पिकांच्या पाहणी करण्यासाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विश्लेष नगरारे, डॉ. राकेश कुमार यांचे पथक मंगळवारी (ता. २५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

परभणी ः नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतावर जाऊन सद्यःस्थितीतील कपाशीच्या पिकांची पाहणी केली.

जिल्ह्यातील कपाशीवर आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सद्यःस्थितील कपाशीची पिकांच्या पाहणी करण्यासाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विश्लेष नगरारे, डॉ. राकेश कुमार यांचे पथक मंगळवारी (ता. २५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

या पथकाने कात्नेश्वर (ता. पूर्णा), रहाटी, असोला, पान्हेरा (ता. परभणी), ताडबोरगाव (ता. मानवत) या शिवारात पाहणी केली. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान यांनी बोंड अळी नियंत्रणासाठी राबविलेल्या जनजागृती मोहिमेमुळे बोंड अळी नियंत्रणात आल्याचे आढळून आले.

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बोंड अळीचे नियंत्रण करावे, असे आवाहनही शास्त्रज्ञांनी केले. या वेळी प्रत्येक ठिकाणच्या कपाशीच्या शेतामधून २० बोंड तपासणीसाठी नागपूर येथे नेण्यात आली. या वेळी मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड, के. एम. जाधव, पर्यवेक्षक आर. के. सय्यद, ए. एल. कदम, जी. आर. शिंदे, एस. एस. वाघमोडे, कृषी सहायक स्वप्नील शिंदे, अनिल वडजे, प्रेम जाधव, पी. पी. चव्हाण, के. बी. पाटील, जी. डी. वैद्य आदी उपस्थित होते. या पथकाने नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील कपाशीची पाहणी केली.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...