परभणीत वांग्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर

परभणीत वांग्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर
परभणीत वांग्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १२) वांग्याची ४० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ८० क्विंटल आवक होऊन १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये वालाची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक असताना ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. लिंबाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com