परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये

परभणी दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये
परभणी दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १०) दोडक्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक येत आहे. तेलगंणातून हिरवी मिरची, नाशिक आणि कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. १०) शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. चवळीची १० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ९ क्विंटल अावक झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. मुगाच्या शेंगाची ७ क्विंटल असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. कारल्याची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

गोल भोपळ्याची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. मधु मक्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com