परभणी फ्लॉवर क्विंटल १००० ते १२०० रुपये
परभणी फ्लॉवर क्विंटल १००० ते १२०० रुपये

परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये

परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १७) फ्लॅावरची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल झाली असताना प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

वांग्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले.

भेंडीची २० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मधु मक्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com