परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये

परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १४) फ्लॅावरची ६० क्विंटल आवक होती. फ्लॅावरला प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ७० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर  मिळाले. कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर  मिळाले.

मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ३००  ते ४०० रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. 

दोडक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com