परभणीत करडई, हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रकल्प

मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र
मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामामध्ये नऊ तालुक्यांमध्ये राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत करडई पिकांचे ३२० हेक्टर आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्यअंतर्गत हरभरा पिकांचे २,०५० हेक्टरवर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना हरभरा पिकांचे १,२७७ मिनिकिट वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलताड अभियान २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये करडईच्या परभणी-१२ वाणाचे ३२० हेक्टरवर प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० किलो बियाण्यांसाठी ३००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

करडईचे प्रतिप्रकल्प १० हेक्टर याप्रमाणे एकूण ३२ प्रकल्प घेण्यात येणार आहेत. परभणी तालुक्यात ६० हेक्टर, जिंतूर तालुक्यामध्ये ५० हेक्टर, सेलू , मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३० हेक्टर असे एकूण ३२० हेक्टरवर करडई पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.  

२,०५० हेक्टरवर हरभरा प्रात्यक्षिक प्रकल्प राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्यअंतर्गत सलग क्षेत्रावर, तसेच खरीप ज्वारीनंतर रब्बी हरभरा असे दोन्ही प्रकारचे २,०५० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सलग क्षेत्रावरील हरभरा प्रात्यक्षिकांमध्ये परभणी तालुक्यात ३१० हेक्टर, जिंतूर तालुक्यात २१० हेक्टर, सेलू, मानवत तालुक्यात प्रत्येकी १३० हेक्टर, पाथरी तालुक्यात ७० हेक्टर, गंगाखेड तालुक्यात १६० हेक्टर, सोनपेठ तालुक्यात ११० हेक्टर, पालम तालुक्यात ८० हेक्टर, पूर्णा तालुक्यात १२० हेक्टर असे एकूण १,३२० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी ३० किलो याप्रमाणे हरभराच्या दिग्विजय, जॅकी ९२१८ वाणांण्या बियाण्यांसाठी हेक्टरी ७,५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. खरीप ज्वारीनंतर रब्बी हरभरा पिकाचा ७३० हेक्टरवर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये परभणी तालुक्यामध्ये १८० हेक्टर, जिंतूर तालुक्यामध्ये १०० हेक्टर, सेलू तालुक्यामध्ये ७० हेक्टर,पाथरी, सोनपेठ, गंगाखेड,पालम,पूर्णा तालुक्यात प्रत्येकी ६० हेक्टरचा समावेश आहे.

या प्रात्यक्षिकांसाठी हेक्टरी ९,४०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दोन्ही प्रात्यक्षिकांसाठी हरभऱ्याच्या ३० किलोच्या बॅगसाठी शेतकऱ्यांना ६५ रुपये लोकवाटा भरावा लागणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्यअंतर्गत राष्ट्रीय बीज महामंडळ आणि आयएफएफडीसीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा लागवडीसाठी मिनीकिट वितरित करण्यात येणार आहेत.

प्रत्येक प्रात्यक्षिकासाठी हरभऱ्याच्या जॅकी ९२१८ आणि आरव्हीजी-२०३ वाणांच्या १६ किलो बियाण्याचे १,२७७ मिनीकिट वितरित केले जाणार आहेत. यामध्ये परभणी, जिंतूर तालुक्यात प्रत्येकी २२९ मिनीकिट, सेलू तालुक्यात १२२ मिनीकीट, मानवत, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पूर्णा या तालुक्यात प्रत्येकी ११६ मिनकीट वितरित केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com