परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये

परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १२) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले.

काकडीची ५० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. 

वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ७ हजार जुड्यांची आवक प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कैरीची ३५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com