परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये

मराठवाड्यातील प्रकल्पांत उपयुक्‍त साठा ३१ टक्‍क्‍यांवर
मराठवाड्यातील प्रकल्पांत उपयुक्‍त साठा ३१ टक्‍क्‍यांवर

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ५ क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

गवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. मुगाच्या शेंगांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. वांग्याची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले.

फ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले.

भेंडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची १० हजार नग आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रूटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ५ क्विंटल असतांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com