परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये

परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये

परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ११) हिरव्या मिरचीची ९० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाटाण्याची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. वालाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १५० ते ३०० रुपये दर मिळाले.

वांग्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. 

भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

काकडीची ३० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ जार नग आवक असताना प्रतिशेकडा २०० ते ५०० रुपये दर मिळाले. गाजराची २०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. लिंबाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चनाच्या ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com