परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये

परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २१) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच अन्य जिल्ह्यांतून भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. वांगे, टोमॅटो, गवार, भेंडी, चवळी आदी भाज्यांची स्थानिक परिसरातून आवक येत आहे. मेथीची बीड जिल्ह्यातून आवक होत आहे. आवक वाढल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत.

शुक्रवारी (ता. २१) शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ८ क्विंटल असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. वालाची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.

काकडीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.

फ्लॅावरची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ६ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com