agriculture news in marathi, Parbhani ground water level decerease, Maharashtra | Agrowon

परभणीत भूजल पातळी घटली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा गंगाखेड तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक म्हणजे ७.४३ मीटरने घटली; तर मानवत तालुक्यातील भूजल पातळी सर्वात कमी २.६३ मीटर घटल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा गंगाखेड तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक म्हणजे ७.४३ मीटरने घटली; तर मानवत तालुक्यातील भूजल पातळी सर्वात कमी २.६३ मीटर घटल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.

यंदा कमी पाऊस झाल्यामुळे गतवर्षीच्या आॅक्टोंबर महिन्याच्या तुलनेत भूजल पातळी १.१  मीटर ते ३.३ मीटर पर्यंत घटली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. विहिरी बोअरद्वारे केल्या जाणाऱ्या सिंचनासाठी पाणी अपुरे पडणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात ५४६ मि.मी. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७०.४८ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ओढे-नाले भरून वाहिले नाहीत. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे २२ लघुतलाव; तसेच २ मध्यम प्रकल्पांच्या धरणांमध्ये गतवर्षीइतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यंदा भूजल पातळी गतवर्षीच्या तुलनेत १.१ ते ३.३ मीटरने घटली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्ह्यातील परभणी तालुक्यात १४ निरीक्षण विहिरी आहेत, जिंतूर तालुक्यात २०, सेलू तालुक्यात १२, मानवत तालुक्यात ९, पाथरी तालुक्यात ८, सोनपेठ तालुक्यात ५, गंगाखेड तालुक्यात ९, पालम तालुक्यात ७, पूर्णा तालुक्यात ७ निरीक्षण विहीरी असून जिल्ह्यात एकूण ८६ निरीक्षक विहिरी आहेत. गंगाखेड तालुक्यातील भूजलपातळी सर्वाधिक; तर मानवत तालुक्यातील भूजलपातळी सर्वात कमी घटल्याचे आढळून आले आहे. गतवर्षीच्या आॅक्टोबर महिन्यातील पाणी पातळीच्या तुलने यंदा पूर्णा तालुक्यातील पाणीपातळी सर्वाधिक म्हणजे ३.३ मीटर घटली आहे. सेलू तालुक्यातील भूजलपातळी सर्वात कमी म्हणजे १.१ मीटरने घटली आहे. भूजल पातळी घटल्यामुळे अनेक तालुक्यांतील गावांमध्ये लवकरच पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. 
 

परभणी जिल्हा तुलनात्मक भूजलपातळी स्थिती (मीटरमध्ये)
तालुका  २०१७ २०१६
परभणी                         
 
६.५६ ५.१९
जिंतूर ३.६३ ३.८०  
सेलू ५.६३ ४.५३
मानवत २.६३ १.५०
पाथरी  ५.७४ ५.८३
सोनपेठ ७.०२ ५.०८
गंगाखेड ७.४३ ५.३८
पालम ४.८६ २.९७
पूर्णा ४.७० १.४६

 

इतर ताज्या घडामोडी
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...