agriculture news in marathi, Parbhani, Hingoli district Rabbi sowing crosses 1 lakh hectar, Maharashtra | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता.३१)पर्यंत अनुक्रमे ५७ हजार ४३६ हेक्टरवर (२०.७१ टक्के) आणि ५० हजार १४ हेक्टर (३९.६० टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख ७ हजार ४५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. दोनही जिल्ह्यांत करडईचा पेरा घटला आहे. हिंगोली जिल्ह्यात हरभराच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात गव्हाची पेरणी सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता.३१)पर्यंत अनुक्रमे ५७ हजार ४३६ हेक्टरवर (२०.७१ टक्के) आणि ५० हजार १४ हेक्टर (३९.६० टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख ७ हजार ४५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. दोनही जिल्ह्यांत करडईचा पेरा घटला आहे. हिंगोली जिल्ह्यात हरभराच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात गव्हाची पेरणी सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २७ लाख ३६७ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७३ हेक्टर आहे. गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार ६४ हेक्टर, करडई २५ हजार २०९ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. मंगळवार (ता.३१) पर्यंत ज्वारीची ३७ हजार ८१७ हेक्टर, गव्हाची ३२ हेक्टर, हरभऱ्याची १८ हजार ४५२ हेक्टर, करडईची ७५२ हेक्टर, रब्बी मक्याची ३६३ हेक्टर अशी एकूण ५७ हजार ४३६ हेक्टरवर म्हणजेच २०.७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. 

यंदा करडई या तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रात मोठी घट झाली असून ७५२ हेक्टर म्हणजेच केवळ २.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी नुकतीच सुरू झाली आहे. परभणी तालुक्यात १ हजार ७१० हेक्टर, जिंतूर तालुक्यामध्ये १० हजार २९० हेक्टर, सेलू तालुक्यात १५ हजार ९७० हेक्टर, मानवत तालुक्यात ७ हजार ८० हेक्टर, पाथरी तालुक्यात ३ हजार ६५९ हेक्टर, सोनपेठ तालुक्यात ६ हजार १५२ हेक्टर, गंगाखेड तालुक्यात ४ हजार ९५० हेक्टर, पालम तालुक्यामध्ये १ हजार ८२६ हेक्टर, पूर्णा तालुक्यामध्ये ५ हजार ७९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर पेरणी...
जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी २२ हजार ८१० हेक्टर, गहू ३२ हजार ५४० हेक्टर, हरभरा ३५ हजार ३६० हेक्टर, करडई २७ हजार ९७० हेक्टर, जवस ४९० हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश मंगळवार (ता.३१) पर्यंत ५० हजार ११ हेक्टरवर (३९.६० टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारी ४ हजार ४५८ हेक्टर, गहू २ हजार ८५३ हेक्टर, हरभरा ४२ हजार ६६ हेक्टर, करडई २६४ हेक्टर, जवस ५० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून फक्त ०.९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या ११८.९६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा अनेक भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन काढणीस उशीर झाला. रान तयार नसल्यामुळे रबीच्या पेरणीस उशीर झाला आहे. मूग,उडिदाच्या तसेच खरिपामध्ये नापेर राहिलेल्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...