परभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण

परभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण
परभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण

परभणी ः परभणी जिल्ह्यातील सर्वंच बॅंकांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दूर राहिले आहे. यंदा रविवारअखेर (ता. ३० सप्टेंबर) जिल्ह्यातील ८३ हजार ३८५ शेतकऱ्यांना ४४० कोटी २७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ३०.०५ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. यंदा ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज देण्यात आले. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ५२ कोटी ३६ लाख रुपये, खासगी बॅंकांना ५२ कोटी ४७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ कोटी ४७ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश होता.

रविवारपर्यंत (ता. ३०) राष्ट्रीयीकृत बॅंकांनी २३ हजार ७७७ शेतकऱ्यांना १७८ कोटी ७३ लाख रुपये (१६.७८ टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ३३७ शेतकऱ्यांना २७ कोटी ३५ लाख रुपये (५२.१३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १९ हजार ९५४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ६२ लाख रुपये (७२.७६ टक्के), जिल्हा बॅंकेने ३७ हजार ३१७ शेतकऱ्यांना ८८ कोटी ५७ लाख रुपये (५३.५३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोळात यंदा पीककर्जाचे नूतनीकरण करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसह अन्य शेतकरी मिळून एकूण ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.

यंदा महाराष्ट्र ग्रामीण पीककर्ज वाटपात आघाडीवर राहिली आहे; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंका पिछाडीवर राहिल्या आहेत. खासगी बॅंका आणि जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पीककर्ज वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com