परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये

परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १४) भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये पालकाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चुक्याची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. 

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १०० ते १५०० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची ८० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची २५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com