agriculture news in marathi, Parbhani seasonal PAISEWARI 44.95 paise | Agrowon

परभणीची सुधारित हंगामी पैसेवारी ४४.९५ पैसे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

परभणी : परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांतील खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसवारी सरासरी ४४.९५ पैसे आली आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांतील सुधारित हंगामी पैसेवारी ६८.०५ पैसे आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ८५३ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द, लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित झाल्यामुळे एकूण ८४९ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.

परभणी : परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांतील खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसवारी सरासरी ४४.९५ पैसे आली आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांतील सुधारित हंगामी पैसेवारी ६८.०५ पैसे आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ८५३ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द, लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित झाल्यामुळे एकूण ८४९ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.

साईनगर या नवीन गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे जिंतूर तालुक्यातील एकूण गावांची संख्या १७१ झाली आहे. यंदा पैसेवारी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ८४९ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा ती एकने वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी यंदाच्या खरीप हंगामातील नजरी हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, पालम या तीन तालुक्यांतील २१९ गावांची हंगामी (नजरी) पैसेवारी ५० पेक्षा कमी, तर  ६३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त, तर जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५१.९४ पैसे आली होती. जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ८३ हजार ३७८ हेक्टर आहे.

यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ५१ हजार २४ हेक्टवर पेरणी झाली. ३२ हजार ४४३.९५ हेक्टर क्षेत्र नापेर (पडीक) राहिले होते. मंगळवार (ता. ३१) पर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४६ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७०.३ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आल्याचे पीक कापणी प्रयोगावरून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र असलेल्या सर्व ८४९ गावांतील खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आले.

जिल्ह्याची सरासरी सुधारित हंगामी पैसेवारी ४४.९५ पैसे आली आहे. यामुळे शासन जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या सवलती जाहीर करू शकते; परंतु त्यासाठी अंतिम पैसेवारीची जाहीर होईपर्यंत थांबावे लागणार आहे.

हिंगोलीची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ७०७ गावांची यंदाच्या खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६८.०५ पैसे आली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ८४ हजार ५०७.७ हेक्टरवर पेरणी झाली होती. १६ हजार ६९२.९१ हेक्टर जमीन नापेर राहिली होती. यंदा ६३९.४ मिलिमीटर (७२.२ टक्के) पाऊस झाला. आधी पावसाच्या खंडामुळे नंतर काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते.

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. ३१) खरिपाची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर केली. हिंगोली तालुक्याची पैसेवारी (१५२ गावे) ७०.१४ पैसे, कळमनुरी तालुका (१४८ गावे) ७०.०९ पैसे, वसमत तालुका (१५२ गावे) ७२.९६ पैसे, औंढा नागनाथ तालुका (१२ गावे) ५८ पैसे, सेनगांव तालुका (१३३ गावे) ६९.१० पैसे आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...