agriculture news in marathi, Parbhaniit crop loan issue: The agitation of the farmers committee | Agrowon

परभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी समितीचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप प्रश्नांवर तसेच नवीन खातेदारांना कर्जवाटप करावे, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप प्रश्नांवर तसेच नवीन खातेदारांना कर्जवाटप करावे, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

रिझर्व्‍ह बॅंकेच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना प्रचलित बॅंकेतून (दत्तक असो अथवा नसो) स्केल आॅफ फायनान्सप्रमाणे पीक कर्जवाटप करण्यात यावे. बॅंक बदलण्याची सक्ती करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. यंदाच्या खरीप हंगामात चुकीच्या आदेशामुळे जिल्ह्यातील ७० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित रहावे लागले आहे. नवीन खातेदारांना कर्जाचे वाटप नगण्य आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अनागोंदी कारभारामुळे पीक कर्जाचे वाटप अत्यंत कमी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्जमाफीची रक्कम पीक कर्जवाटपासाठी उपलब्ध करून द्यावी. थकबाकीदार शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करावे.

जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, पूर्णा नद्यावरील बंधारे, धरणे, तलाव यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाइपलाइनसाठी कर्ज देण्यात यावे. नाबार्ड, राज्य सरकार यांच्याकडून पीक कर्जवाटपासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. नवीन खातेदारांना कर्जवाटप करावे, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, माधुरी क्षीरसागर, नवनाथ कोल्हे, शिवाजी कदम, अर्जुन समिंद्रे, ज्ञानेश्वर काळे आदीसह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर बातम्या
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...