agriculture news in marathi, pargaon sudrik and khetmaliswadi ahead in grapes production | Agrowon

पारगाव, खेतमाळीसवाडीचा दर्जेदार द्राक्ष उत्पादनात दबदबा
सूर्यकांत नेटके
शनिवार, 31 मार्च 2018

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्‍यातील पारगाव सुद्रिक-खेतमाळीसवाडी गावांनी द्राक्ष शेतीत स्वतंत्र अोळख तयार केली आहे. सन २००० नंतर इथे द्राक्षशेतीचा तंत्रज्ञान, मार्केट आदी अंगाने खऱ्या विस्तार झाला. इथल्या मातीत पिकणाऱ्या दर्जेदार द्राक्षांना गावातच मार्केट तयार झाले आहे. व्यापारी काही दिवस मुक्काम ठोकून ही द्राक्षे खरेदी करून जातात.  

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्‍यातील पारगाव सुद्रिक-खेतमाळीसवाडी गावांनी द्राक्ष शेतीत स्वतंत्र अोळख तयार केली आहे. सन २००० नंतर इथे द्राक्षशेतीचा तंत्रज्ञान, मार्केट आदी अंगाने खऱ्या विस्तार झाला. इथल्या मातीत पिकणाऱ्या दर्जेदार द्राक्षांना गावातच मार्केट तयार झाले आहे. व्यापारी काही दिवस मुक्काम ठोकून ही द्राक्षे खरेदी करून जातात.  

नगर जिल्ह्यात पारगाव सुद्रिक आणि शेजारीच असलेली खेतमाळीसवाडी ही तशी एकत्रच आहेत. इथला ग्रामस्थ काष्टी, वांगदरी, वडगाव, आदी गावशिवारात पूर्वी मजुरीची कामे करायचा. गावशिवारात कमी पाण्यावर येणाऱ्या लिंबूची स्वातंत्रपूर्व काळापासून लागवड केलेली. बराच काळ गावातील प्रत्येकाकडे पानमळे होते. गावाची ओळखही पानाचे पारगाव अशीच होती. मात्र त्यासाठी लागणारे मजूर, उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने १९८५ नंतर पानमळे नामशेष झाले. काही काळ भाजीपाला उत्पादनही घेतले. 

द्राक्ष शेतीचा श्रीगणेशा 
साधारण १९७६ च्या दरम्यान येथील मधुकर हिरवे यांनी द्राक्ष शेतीचा गावात श्रीगणेशा केला असे सांगितले जाते. सन २००० नंतर रमेश हिरवे, अशोक होले, दत्तात्रय हिरवे, तात्या हिरवे, भगवान होले, बबन इथापे, अनिल कोदरे आदींच्या पुढाकारातून द्राक्ष लागवड विस्तारली. 

परदेशात द्राक्षनिर्यात 
 गावातील रमेश हिरवे यांची आठ एकर द्राक्ष बाग आहे. त्यांचे कृषी सेवा केंद्र, स्वयंसेवी संस्था व माउली शेतकरी कंपनीही आहे. ते एमएस्सी ॲग्री आहेत. सन २००५ च्या दरम्यान त्यांनी निर्यातक्षम द्राक्षशेती सुरू केली. एका कंपनीच्या माध्यमातून युरोपला द्राक्षनिर्मितीही केली. लोकल मार्केटला ज्या वेळी किलोला २५ रुपये दर सुरू होता, त्या वेळी त्यांना स्थानिक निर्यातदार संस्था ४५ रुपये दर देत होती. ही शेती फायदेशीर वाटल्याने अन्य सहकाऱ्यांनीही निर्यातक्षम शेतीस सुरवात केली. जर्मनी, रशिया आदी देशांत त्यांनी निर्यात साधली. मात्र परदेशात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत स्थानिक मार्केटवरच शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.  

परराज्यांतील व्यापाऱ्यांचा मुक्काम
पारगाव सुद्रिक परिसरात द्राक्षांची गुणवत्ता चांगली असल्याचा अनुभव दिल्ली, लुधियाना, हैदराबाद, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आदी भागांतील व्यापाऱ्यांना आला. आता खरेदीसाठी त्यांचा काही काळ गाव परिसरातच मुक्‍काम असतो. ते थेट बागेतून द्राक्षांची खरेदी करतात. वजन करून गाड्या भरल्या जातात. रोखीने पेमेंट होते. काहीवेळा व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे अनुभव अाले.

मिळणारे दर (किलोचे)

  • सद्यःस्थितीत- ६० ते ६५ रु.- जागेवर 
  • मागील वर्षी अन्य ठिकाणी २५ रु. दर सुरू असताना या भागात ४० रु.
  • अलीकडील वर्षांतील दरांची ‘रेंज’- ३० ते ३५ रु. 

थेट विक्री
पारगाव सुद्रिक गावाशेजारून असलेल्या श्रींगोदा रस्त्यावर गावातील अनेक महिला द्राक्षांची थेट विक्री करतात. त्यातूनन दीड टन मालाचा खप चांगल्या दराने होऊन अधिकचे उत्पन्न त्यांच्या हाती पडते.

काही टन कागदाची गरज 
क्रेटमध्ये द्राक्षे भरली जात असल्याने वृत्तपत्राच्या रद्दीचा वापर केला जातो. प्रत्येक हंगामात पारगाव सुद्रिक- खेतमाळीसवाडी शिवारात त्यासाठी सुमारे वीस टन रद्दी लागते, असे विक्रेते राजेंद्र कोठारी  यांनी सांगितले. 

शेततळ्याचा आधार
पारगाव शिवाराला कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळते. मात्र अलिकडील वर्षांत दुष्काळाचाही फटका बसला. त्या काळात शेतकऱ्यांनी विकतच्या पाण्यावर बागा जगवल्या. गावात सर्वाधिक सव्वादोनशे शेततळी आहेत. विशेष म्हणजे १९७२ च्या दुष्काळात लिंबू बागा जगविणारे आणि पाण्याचे महत्त्व समजलेले पारगावचे शेतकरी १९९० पासून फळबागांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करतात. 

गावासंबंधी अन्य बाबी 

  • पारगावचे ग्रामदेवत सुद्रिकेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून. विठ्ठल-महादेव मंदिराचा ५५ लाख रुपये खर्चून जीर्णोद्धार. 
  • गावात पारगाव सेवा सहकारी सोसायटी कार्यरत  यात एकूण कर्जवाटप- १३ कोटी ४९ लाख रु.
  • पीककर्ज- सात कोटी ६६ लाख रु.
  •  शेततळे बांधण्यासाठी कर्ज- एक कोटी     २४ लाख रु. दिले असून कर्ज वसुली- ८५ टक्के आहे. अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकानीही पारगावात कर्जवाटप

 ः रमेश हिरवे, ९४२२९१८८७०  
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...